मुंबई : महागाईत सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका लागला आहे. आताची सर्वात मोठी बातमी आहे. वाढत्या महागाईत आता घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
बांधकामासाठी लागणारं सिमेंट महागणार आहे. इंडिया सिमेंट्स कंपनीने सिमेंटचे दर पोत्यामागे 55 रूपयांनी वाढवले आहेत. जूनपासून टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्यात येईल.
1 जूनला 20 रूपये, 15 जूनला 15 रूपये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात 20 रूपये अशी दरवाढ होणार आहे. सिमेंट महागल्यामुळे बांधकाम खर्च वाढेल. त्यामुळे घरांच्या किंमती वाढवून ग्राहकांवर बोजा पडेल. त्यामुळे घरांचं स्वप्न महागणार आहे.
सिमेंटच्या किंमती वाढल्याने आता घरांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मात्र सिमेंटच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिथे गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.