15 ऑगस्टला झेंडावंदन करणार पण, राष्ट्रगीत गाणार नाही: मुस्लिम धर्मगुरू

१५ ऑगस्ट हा देशभक्ती साजरा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस देशभक्ती दिवस म्हणूनच साजरा करावा, असेही आवहन या धर्मगुरूने मुस्लिम धर्मीयांना केले आहे.

Updated: Aug 13, 2017, 05:36 PM IST
15 ऑगस्टला झेंडावंदन करणार पण, राष्ट्रगीत गाणार नाही: मुस्लिम धर्मगुरू title=

लखनऊ : स्वातंत्र्य दिनादिवशी झेंडावंदन करा पण, राष्ट्रगीत म्हणू नका अशा आषयाचे वक्तव्य उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम धर्मगुरूने केले आहे. या धर्मगुरूचे म्हणने असे की, असे करणे हे इस्लामविरोधी आहे. १५ ऑगस्ट हा देशभक्ती साजरा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस देशभक्ती दिवस म्हणूनच साजरा करावा, असेही अवाहन या धर्मगुरूने मुस्लिम धर्मीयांना केले आहे.

काजी मौलाना असजद खान असे या धर्मगुरूचे नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत खान यांनी शनिवारी म्हटले आहे की, 'हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटीश राजा पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी लिहीले होते. इस्लामच्या आदेशानुसार आमचा 'अधिनायक' अल्लाह आहे. पंचम जॉर्ज नाही. आम्ही राष्ट्रगीताचा अपमान करत नाही. पण, आमच्या धर्मियांच्या भावना विचारात घेता  आम्हे हे गीत गाऊ शकत नाही.'

दरम्यान, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हेसुद्धा इस्लामच्या विरोधात असल्याचे खान यांचे म्हणणे आहे. मदरशांमधून आम्ही तिरंगा फडकवू आणि राष्ट्रगीताऐवजी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान गाऊ असेरी खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, योगी सरकारने १५ ऑगस्टला राज्यातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायनाची योगी सरकारने आदेश दिले आहेत. तसेच, तिरंगा फडकावण्यासोबतच राष्ट्रगीत गात असतानाचे तसेच, सांस्कृतीक कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींगही करण्याचे आदेश दिले आहेत.