श्रीनगर : भारताविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी पुंछच्या देगवार सेक्टरमध्ये आज सकाळी 4 वाजता भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाक सैनिकांनी भारताच्या मुख्य चौक्यांवर हल्ला केला.
भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानच्या या फायरिंगला सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार कमी झाला. 20 मिनिटानंतर पाकिस्तानकडून गोळीबार कमी झाला. पाकिस्तानच्या या हरकतीमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या फायरिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती पुढे आलेली नाही.
मागच्या आठवड्यात देखील पाकिस्तानने भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचं हॅलिकॉप्टर देखील भारतीय हद्दीत आलं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये 2018 च्या जुलै महिन्यापर्यंत पाकिस्तानने 1435 वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
सीमा भागात आणि एलओसीवर झालेल्य़ा हा गोळीबारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 232 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.