...तर भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत

Updated: Oct 14, 2018, 10:31 AM IST
...तर भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती title=

लंडन: भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास १० सर्जिकल स्ट्राईक करू अशी दर्पोक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केली आहे. लंडन इथल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसमोर त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवाही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत त्यांनी पाकिस्तानची ताकद पाहावी अशी दर्पोक्ती त्यांनी केलीय. ५० दशलक्ष डॉलरचा सीपेक कॉरिडॉर पाक लष्कराच्या सुरक्षेखाली आहे. या प्रकल्पामुळे पाकची आर्थिक ताकद वाढेल, असेही गफूर यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानमधील वाईटपणापेक्षा चांगल्या विकासकामांवरही लक्ष द्यावे. पाकमध्ये वाईटापेक्षा चांगली कामे जास्त होत आहेत, असेही गफूर म्हणाले.