Video : पैज लावून सांगतो, मांजर आणि उंदराचं असं भांडण तुम्ही पाहिलंच नसेल...

सोशल मीडिया हे इंटरनेटवरील एक असं प्लॅटफॉर्म आहे, जो तुमचं मनोरंजन करतं. एवढंच नाही तर येथे तुम्हाला पाहिजेतो कन्टेन्ट पाहायला मिळतो.

Updated: Aug 4, 2022, 05:13 PM IST
Video : पैज लावून सांगतो, मांजर आणि उंदराचं असं भांडण तुम्ही पाहिलंच नसेल... title=

मुंबई : सोशल मीडिया हे इंटरनेटवरील एक असं प्लॅटफॉर्म आहे, जो तुमचं मनोरंजन करतं. एवढंच नाही तर येथे तुम्हाला पाहिजेतो कन्टेन्ट पाहायला मिळतो. म्हणूनच तर इथे तुमचा वेळ कसा निघून जातो, हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. इथे दररोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यामध्ये प्राणी आणि पक्षी यांच्याशी संबंधित व्हिडीओंची संख्या सर्वाधिक आहे. सध्या अशाच प्राण्याशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सर्वांचं मनोरंजन करत आहे.

हा व्हिडीओ उंदीर आणि मांजर यांच्यातील भांडणाशी संबंधित आहे. या दोघांमध्ये एवढी धोकादायक लढत पाहायला मिळते की, बस रे बस...

उंदीर आणि मांजर इतक्या स्पीडने एकमेकांशी भांडण करत आहेत की, पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, मांजरीने स्वतःवर हल्ला केल्याचे पाहून उंदीर अजिबात हार मानत नाही. तो शिकारीच्या तावडीतून सुटण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर catsclubofusa नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आले आहे. उंदीर आणि मांजर यांच्यातील भांडणाशी संबंधित या व्हिडीओला काही तासांत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.