२००० हजारांहुन अधिक रक्कमेचा रोख व्यवहार करणे ठरेल महागात!

काळ्या पैशाविरूद्ध मोदी सरकार सातत्याने पाऊलं उचलत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 25, 2018, 06:52 PM IST
२००० हजारांहुन अधिक रक्कमेचा रोख व्यवहार करणे ठरेल महागात! title=

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरूद्ध मोदी सरकार सातत्याने पाऊलं उचलत आहे. यासाठी सरकारने अनेक अभियान सुरू केले आहेत. या अभियानाअंतर्गत सामान्य माणसापासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी नियम तयार करण्यात आले. त्या नियमांचे उल्लंघन करणे त्रासदायक ठरू शकते.

सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

आयकर विभागाने अलीकडेच ट्वीट करून सामान्य लोकांना रोख व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. ट्वीटनुसार, काही जागांवर २००० हुन अधिक रुपयांचा रोख व्यवहार केल्यास समस्या उद्भवू शकते. या चार ठिकाणी रोख व्यवहार करताना आयकर विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आयकर विभागाने दिला आहे.

या ठिकाणी २००० हुन अधिक रोख व्यवहार करू नका 

एनजीओ, ट्रस्ट किंवा राजनेतिक दलात तुम्हाला २००० हुन अधिक किंमतीचे दान करायचे असल्यास रोख व्यवहार करू नका. 

येथे १०,००० हुन अधिक रोख व्यवहार टाळा

तुम्ही जर व्यावसायिक असला आणि त्यासंबंधित व्यवहार करताना १०,००० हुन अधिक किंमतीचा रोख व्यवहार करणे टाळा.

२०,००० हुन अधिक रोख येथे वर्ज्य

जर तुम्ही तुमच्या जंगम मालमत्तेचे हस्तांतरण करत असाल तर तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अशा व्यवहारात पैसे देणार असाल किंवा घेणार असाल तरीही २०,००० हुन अधिक किंमतीचा रोख व्यवहार करणे टाळा.

येथे २ लाखांहुन अधिकचा रोथ व्यवहार करु नका

एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत २ लाखांहुन अधिकचा रोथ व्यवहार करु नका.

येथे करा तक्रार

आयकर विभागाने सांगितले आहे की, अशा व्यवहारांवर कर लावण्यात येईल. या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला विभागाकडून सूचना दिल्या जातील.
यासंबंधित संपूर्ण माहिती तुम्ही प्रधान आयकर आयुक्तांना देऊ शकता. त्याचबरोबर blackmoney@incometax.gov.in वर ईमेल करू शकता.