GOOD NEWS: या बँकेत जर तुमचे खाते आहे तर घरबसल्या मिळणार या सुविधा

सरकारी बँकांची अवस्था सुधारण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. बँकिंग रिफ़ॉर्म्समध्ये सरकार काही रक्कम बँकांना देणार आहे. ही रक्कम बँकांवरील ताण कमी करण्यासाठी असेल मात्र याचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे. 

Updated: Jan 25, 2018, 03:37 PM IST
GOOD NEWS: या बँकेत जर तुमचे खाते आहे तर घरबसल्या मिळणार या सुविधा title=

नवी दिल्ली : सरकारी बँकांची अवस्था सुधारण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. बँकिंग रिफ़ॉर्म्समध्ये सरकार काही रक्कम बँकांना देणार आहे. ही रक्कम बँकांवरील ताण कमी करण्यासाठी असेल मात्र याचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे. 

ज्या सरकारी बँकांना रक्कम दिली जाणार आहे त्यात जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लवकरच काही सुविधा घरबसल्या मिळतील. याशिवाय अनेकाविध सुविधा मिळणार आहेत. सरकारने याबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर घोषणा केली. 

घर बसल्या मिळणार या सुविधा 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
जनधन खाता
बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट होल्डर्सना 2-2 लाख रुपयांचे विमा देण्यासाठी अभियान राबवणार बँक

वरिष्ठ नागरिकांना मिळणार या सुविधा

वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरीच मिळणार बँकिंग सर्व्हिस
प्रत्येक देण्याघेण्याच्या व्यवहार त्यांच्या घरीच होणार

 

होम बँकिंगची सुविधा लवकरच

घरबसल्या आणि मोबाईलच्या मदतीने बँक खाते खोलता येणार
नॉमिनेशन डिटेल्स भरु शकणार
कर्जासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार
सरकारी बँकां स्वत: देणार ऑनलाईन लोन अॅप्लिकेशनची सुविधा

१० दिवसांच्या आत मिळणार रिफंड

डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये फसवणूक झाल्यास ग्राहकांना १० दिवसांच्या आत रिफंड मिळणार

लघु उद्योजकांना फायदा

लघु उद्योजकांना ऑनलाईन लोन अॅप्लिकेशनच्या सुविधेचा फायदा होणार आहे. त्यांना सहजपणे लोन मिळेल. 

अर्जाची पाने कमी होणार

बँक खाते खोलण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अर्जांची पाने कमी होणार. अधिकाधिक दोन पेजचे अर्ज असतील. 

५ किमीच्या अंतरावर बँक

प्रत्येक गावात पाच किमी अंतरावर बँक असेल. प्रधानमंत्री जनधन योजना आणि अन्य सरकारी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार.

तुमचे पैसे सुरक्षित राहणार

कोणतीही बँक बंद होणार नसल्याने तुमचे पैसे सुरक्षित राहणार असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. 

येथे मिळेल मोबाईल एटीएम

ज्या ठिकाणी बँका नाहीत अथवा कमी आहेत अशा ठिकाणी मोबाईल एटीएमची सुविधा मिळेल. बँक मोबाईल अॅप आणि वेबसाईटद्वारे फायनान्शियर कामे होणार.

बँकिंग आऊटलेट्समध्ये मिळणार चांगली सेवा

सर्व बँकांच्या आऊटलेटवर जीआयएसवर आधारित मॅपिंग होईल.