FIR against Baba Ramdev : धार्मिक भावना दुखावल्याचा (religious sentiments) आरोपांखाली योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 फेब्रुवारीला राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात हिंदू समाजाच्या संतांच्या एका बैठकीत बोलताना धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप बाबा रामदेव यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी योगगुरू रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाडमेर येथील स्थानिक रहिवासी पठाई खान यांच्या तक्रारीच्या आधारे चौहतान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 153ए, 295अ आणि 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते बाबा रामदेव?
सभेला आलेल्या लोकांना बाबा रामदेव लठ्ठपणावर ज्ञान देत होते. पण अचानक ते इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल बोलू लागले. रामदेव बाबा यांनी मुस्लिमांना दहशतवाद आणि हिंदू महिलांच्या अपहरणाशी जोडले. "मुस्लिमांना विचारा त्यांचा धर्म काय? ते म्हणतील दिवसातून पाच वेळा नमात अदा करा आणि मनात जे येईल ते करा. मग तुम्ही हिंदू मुलींचे अपहरण केले तरी चालेल. तुम्हाला पाहिजे ते पाप करायचे ते करा. इस्लाम म्हणजे नमाज असे त्यांना वाटते. त्यांच्यासाठी दहशतवादी, गुन्हेगार बनून नमाज अदा करणे आवश्यक आहे," असे बाबा रामदेव म्हणाले.
संपूर्ण जग इस्लाममध्ये बदलून करायचंय काय?
"घोट्याच्यावर पायजामा घाला, मिशी कापून टोपी घाला हा त्यांच्यासाठी स्वर्ग आहे. असे कुरानमध्ये सांगितले आहे मी नाही. पण ही लोकं अशीच करत आहेत. एवढंच केलं तर त्यांना स्वर्गात जागा मिळेल. तिकडे दारू प्यायला मिळेल. पण असा स्वर्ग नरकाहून वाईट आहे. पण तरीही हे लोक मिशा कापतात, टोपी घालतात. हा निव्वळ वेडेपणा आहे. इस्लाम महान संपूर्ण जगाला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल असेच म्हणत आहेत. मी कोणावरही टीका करत नाही पण लोक याच्यात मागे लागले आहेत. काही जण म्हणतातय की ते संपूर्ण जगाला इस्लाममध्ये बदलतील. काही जण म्हणतात की ते संपूर्ण जगाला ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करु. हा बदल करून तुम्हाला करायचे काय आहे ते तरी सांगा," असेही बाबा रामदेव म्हणाले.