या रक्षाबंधनला कॅरी करा हा लुक ...दिसाल सर्वांपेक्षा हटके ... हा पेहराव आहे ट्रेंडमध्ये

 या फेस्टिव्ह सीझनमध्ये कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्रेंडिंग आहेत हे जाणून घेतल्यास, तुम्ही स्टायलिश आणि ट्रेंडी देखील दिसू शकता.

Updated: Jul 23, 2022, 07:17 PM IST
या रक्षाबंधनला कॅरी करा हा लुक ...दिसाल सर्वांपेक्षा हटके ... हा पेहराव आहे ट्रेंडमध्ये  title=

फॅशन टिप्स:  श्रावण महिना जवळ आलाय,श्रावणात अनेक सणांची रेलचेल असते नागपंचमी,  तीज ,रक्षाबंधन  सण जवळ आले आहेत...बहुतेक जणींनी तर रक्षाबंधनाची  खरेदीही सुरू केली असेल.रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुंदर आणि सर्वोत्तम दिसण्याची इच्छा असेल, तर यावेळी कपड्यांची खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही अभिनेत्रींच्या लेटेस्ट लूकमधून टिप्स घेऊ शकता. या फेस्टिव्ह सीझनमध्ये कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्रेंडिंग आहेत हे जाणून घेतल्यास, तुम्ही स्टायलिश आणि ट्रेंडी देखील दिसू शकता.

कियारा आडवाणीप्रमाणे ऑर्गेन्झा फॅब्रिक साडी

तुम्ही सणासुदीला साडी नेसत असाल तर कियारा अडवाणीप्रमाणे ऑर्गेन्झा फॅब्रिक साडीची निवड करू शकता. या धानी रंगाच्या साडीवर पांढऱ्या धाग्यांची नक्षी आहे. सोबतच फ्लोरल प्रिंटचा ब्लाउजही मॅच करण्यात आला आहे. यावर गुलाबी बांगड्या आणि हेवी कानातले घातले आहेत. हा लूक रक्षाबंधनासाठी योग्य आहे.तुम्ही सुंदर दिसाल.साडीचा रंगही ब्राईट आहे. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेबी पिंक, पेस्टल ब्लू साडीही घालू शकता.

नीतू कपूरचा स्टायलिश कुर्ता सेट

जर तुम्हाला पारंपारिक पोशाखांना आधुनिक टच द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या कुर्ता सेटवर ट्राय करू शकता. नीतू कपूरने सेट केलेल्या या कुर्त्यावर धोती स्टाईल सलवार घातली आहे. या गुलाबी रंगाच्या कुर्त्यावर मिरर वर्कने नेक आणि बाहू सजवले आहेत.यासोबत मॅचिंग एम्ब्रॉयडरी दुपट्टा कॅरी केलाय.

दीपिकाचा शरारा सेट

शरारा सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही लांब कुर्त्यासोबत शरारा पेअर करू शकता. मात्र, जर तुम्हाला शरारामध्ये वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही कुर्ता आणि शरारा पॅंटचा रंग बदलू शकता. दीपिकाने येथे गुलाबी रंगाच्या लांब कुर्त्यासोबत ऑफ-व्हाइट शरारा मॅच केला आहे. हा लूक सणासुदीसाठी उत्कृष्ट आणि उत्तम दिसत आहे.

जान्हवीचा प्लाझो सेट

रक्षाबंधनात स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही पलाझो घालू शकता. जान्हवी कपूरचा हा प्लाझो सेट छान लुक देईल. निळ्या रंगाच्या पलाझो को-ऑर्डर सेटमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने पलाझोसह एक छोटा स्ट्रॅपी ब्लाउज घातला आहे. यासोबतच भारतीय टच देण्यासाठी मॅचिंग श्रग देखील जोडण्यात आला आहे. याआधीही अनेक अभिनेत्रींनी पलाझोसोबत क्रॉप टॉप किंवा स्ट्रॅपी ब्लाउज असा लूक केलाय.