Business Opportunity | एका लाखात करता येणाऱ्या 10 व्यवसायांची यादी

  अवघ्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसाय करण्याचे  (Business Opportunity) सर्वोत्तम 10 पर्याय जाणून घ्या.   

Updated: Aug 11, 2021, 08:05 PM IST
Business Opportunity | एका लाखात करता येणाऱ्या 10 व्यवसायांची यादी title=

मुंबई :  नोकरीत काही मजा नाही, आता काही तरी स्वत:चं काही करायला हवं, असं वाटत असेल, तर ही बातमी तुमच्याठीच आहे. अनेकांना व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. पण गाडी अडते ती काय बिजनेस करायचा (Business Opportunity)  आणि त्यासाठी लागणारं आर्थिक भांडवल उभारायचं कसं, या प्रश्नावर. अवघ्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत आम्ही तुम्हाला व्यवसाय करण्याचे 10 पर्याय सांगणार आहोत. (Business Opportunity Start 10 Businesses With Just Rs 1 Lakh Investment  know detalis) 

दुग्धोत्पादन 

दुग्धोत्पादन हा शेतीला पूरक व्यवसाय समजला जातो. तुमच्याकडे जर गाय किंवा म्हैस असेल तर तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरु करु शकता. साधारणपणे एक गाय ही 30 हजारांपर्यंत मिळते. तर प्रति म्हशीचा दर हा 50 ते 60 हजारांपर्यंत मिळते. त्यामुळे तुम्ही 2 गाय किंवा 1 गायीसोबत दुग्ध व्यवसाय करु शकता. दररोज मिळणाऱ्या दुधाची विक्री दुध संकलन केंद्रावर करता येईल. 

फुलांचा व्यवसाय

फुलांचाही व्यवसायही (Flower business) करता येऊ शकतो. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात फुलांची तसेच हारांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही तुमचा व्यवसाय वाढवता येऊ शकतो. गुलाब, मोगरा, झेंडू, सूरजमुखी या आणि यासारख्या अनेक फुलांना सणोत्सावत मोठी मागणी असते. फुलशेती हा पर्यायही सर्वोत्तम आहे. 

जर तुमच्याकडे शेतजमीन असेल, तर तुम्ही शेतात शीशम या सारख्या रोपट्याचं पीक घेऊ शकता. ही रोपं तुम्हाला 8 ते 10 वर्षांमध्ये चांगली कमाई करुन देऊ शकतात.  सध्या एका शीशमच्या एका झाडाला 40 हजारांपर्यंत किंमत आहे.

मधुमक्षिका पालन

मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय (Honeybee business) करता येण्यासारखा आहे. यासाठी तुम्हाला केवळ एक ते दीड लाखांचा खर्च करावा लागेल. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावं लागेल. 

भाजीची शेती

भाजीची शेती करुन चांगली कमाई करता येऊ शकते. यासाठी अधिक जागेचेही गरज नाही. अशा प्रकारच्या शेतीसाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. 

कुक्कुटपालन  (Poultry farming)

कुक्कुटपालनासाठी तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागेल. यासाठी सरकारकडून मुद्रा योजनेतून कर्ज दिलं जातं. सरकारकडून कर्ज घेऊन तुम्ही हा व्यवसाय करु शकता. 

बांबूची शेती 

बांबूच्या शेतीद्वारेही तुम्ही चांगली कमाई करु शकता. सध्या बांबूंपासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांना अधिक मागणी आहे. याशिवाय हे उत्पादनांची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने करता येईल.   

मशरुम 

घरातील बागेत मशरुमची शेती करता येईल. त्यसाठी काहीशी गुंतवणूक आणि मेहनत करावी लागेल. यातून तुम्ही 50 हजारांची कमाई करु शकता. 

मतस्यपालन

मतस्यपालनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवता येतो. यासाठी तुम्हाला शेततळे हवं. तुम्ही तळ्यात कटला, जीताडा, यासारखे मासे घेऊ शकता. 

कोरफड

कोरफडीची झाडे लावून तुम्ही शेती करू शकता. तुम्ही फक्त 10 हजार रुपये खर्च करून  2500 रोपे लावू शकता. या व्यतिरिक्त, ही झाडे देखील विकू शकता. आजकाल एलोवेरा जेल जवळजवळ सर्व घरांमध्ये वापरला जातो.  त्यामुळे जेल काढून पैसे कमवू शकता.