मुंबई : कमाई करण्यासाठी चांगल्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. छोट्या खोली एवढ्या जागेतही तसेच कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. काही व्यवसाय अगदी लो कॉस्टमध्ये सुरू करता येतात. परंतु जबरजस्त नफा कमाईची क्षमता ठेवतात. ( Business Opportunity )
1 लाख रुपयांची गुंतवणूक करून 10 लाखांपर्यंत कमवा
बाजारात जास्त मागणी असलेल्या बटन मशरूमची शेती ऑक्टोबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान करण्यात येते. मशरूम बनवण्यासाठी गहू किंवा तांदूळाच्या भुशात काही केमिकल मिळवून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. कंपोस्ट खत तयार होण्यात महिनाभराचा वेळ लागतो. त्यानंतर एखाद्या चांगल्या जागी 6-8 इंच मोठी परत टाकून मशरूमचे बी लावता येते. ज्याला स्पॉनिंग देखील म्हणतात. बीयांना कंपोस्टने झाकण्यात येते. साधारण 40 ते 50 दिवसात मशरूम बाजारात विकण्याच्या लायकीचा होतो. मशरूमची शेती खुल्यात होत नाही. त्यासाठी शेडसारखी जागा हवी.
भांडवल आणि नफा
मशरूमची शेती 1 लाख रुपयांवरून सुरू करून चांगला नफा कमावता येऊ शकतो. एक किलो मशरूमवर साधारण 25-30 रुपये खर्च येतो.तसेच बाजारात मशरूमची किंमत 250 ते 300 रुपये किलो इतकी असते. मोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये मशरूमचे सप्लाय केल्याने 500 रुपये प्रति किलोसुद्धा विकले जाऊ शकते. अशातच तुमचा नफा मोठा होऊ शकतो. बाजारात थेट विकल्याने मार्जिनदेखील चांगला मिळतो.
काय घ्यावी काळजी