मुलीला सासरी पाठवण्याआधी वडिलांनी असं काही केलं; व्हिडिओ पाहून हैराण झाले लोक

मुलीच्या लग्नात जेव्हा बाबा रडायला लागतो....

Updated: Aug 27, 2021, 01:34 PM IST
मुलीला सासरी पाठवण्याआधी वडिलांनी असं काही केलं; व्हिडिओ पाहून हैराण झाले लोक title=

मुंबई : मुलीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा एक वडील कोणत्याचं गोष्टीचा विचार न करता मुलीच्या आनंदाला प्राधान्य देतो. आयुष्यभर कमावलेला सर्व पैसा तो स्वतःच्या म्हातारपणाचा विचार न करता मुलीच्या लग्नासाठी खर्च करतो. अशाच एका वडिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीचे वडील भावूक झाल्याचं आपल्याला दिसत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, वधू लग्नाच्या स्टेजवर उभी आहे. 

तेव्हा फोटो क्लिक करण्यासाठी नवरी वडिलांना बोलावते, तेव्हा वडिलांना पाहिल्यानंतर ती अत्यंत भावूक होते. मुलीला सासरी पाठविण्यासाठी लग्नातील सर्व गरजा पूर्ण करण्यात गुंतलेल्या वडिलांची स्थिती पाहण्यासारखी आहे. मुलीसाठी वडिलांनी तुफान खर्च केला, पण वडिलांनी मात्र जुने कपडे घातले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा वडील स्टेजवर पोहोचतात तेव्हा नवरी रडू लागते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही या व्हिडिओला अनेकांनी पसंत देखील दिली. वडील आणि मुलीच्या या व्हिडिओवर अनेकांनी लाईक आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत 38 हजार पेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी पाहिला आहे.