1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं

Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?   

सायली पाटील | Updated: Aug 6, 2024, 10:37 AM IST
1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं title=
business news Gautam Adani reveals succession roadmap for adani group latest updates net worth

Gautam Adani Net Worth : (Business News ) भारतीय उद्योग जगतामध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अदानी समुहाच्या (Adani Group) एकूण संपत्तीच्या आकड्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या फरकानं भर पडली आहे. 213 अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात 1,78,62,62,73,00,00 अब्ज रुपयांच्या गडगंज संपत्तीचा आकडा अनेकांना भारावून सोडत असताना आता या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या नावाची एकाएकी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निमित्त आहे ते म्हणजे या उद्योग समुहाचं भवितव्य. 

इथं अंबानींनी त्यांच्या पुढील पिढीकडे व्यवसायाची धुरा सोपवलेली असतानाच आता अदानी समुहाच्या उद्योगाची संपूर्ण जबाबदारी नेमकी कोणाच्या हाती सोपवली जाणार आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. कारण, जवळपास दशकभरापूर्वीच म्हणजेच साधारण 10 वर्षांपूर्वीच गौतम अदानी यांनी स्वत:त्या निवृत्तीला केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं आता उघड झालं आहे. 

(Gautam Adani Succession Plan) नुकतंच ब्लूमबर्गशी संवाद साधताना अदानी यांनी त्यांची भविष्यासाठीची आखणी जाहीर केली असून, आपण 70 व्या वर्षी सक्रिय उद्योग जगतातून निवृत्त होणार असल्याचं सूचित करत यादरम्यान पुढच्या पिढीसाठी नेतृत्त्वक्षमतेसाठी पुरेसा वाव देणारा काळ उपलब्ध असेल असं म्हटलं. 

व्यावसायिक स्थिरतेसंदर्भात त्यांनी उत्तराधिकार महत्त्व या मुद्द्यावर ब्लूमबर्गशी संवाद साधताना आपण या साऱ्याची तयारी 10 वर्षांपूर्वीच सुरू केल्याचं सांगितलं. याच चर्चेदरम्यान अदानी समुहाची सर्व सूत्र येत्या काळात गौतम अदानी यांची मुलं करण आणि जीत अदानी यांच्या हाती असतील. शिवाय प्रणव आणि सागर अदानी या पुतण्यांचाही समुहात मोलाचा वाटा असेल असं त्यांनी सूचित केलं. कौटुंबीय व्यवसायामध्ये प्रत्येकाला समसमान भाग मिळेल असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. 

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!

 

'वारसदारांविषयीची आखणी मी दहा वर्षांपूर्वीच सुरू केली होती आणि हळुहळू मी आमची पुढची पिढी म्हणजेच प्रणव, करण, सागर आणि आता जीतलाही यामध्ये सहभागी करून घेतलं आहे', असं म्हणत अदानींनी आपल्या पुढच्या पिढीप्रती विश्वास व्यक्त केला. आपल्या पुढच्या पिढीमध्ये व्यवसायातील प्रगतीप्रतीची ओढ असल्याचं पाहून मला आनंद होतो असं म्हणत वारसा हक्क व्यवसायातील स्थिरतेसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 

अदानींची पुढची पिढी सध्या काय करते? 

गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी सध्या अदानी पोर्ट्स एंड स्पेशल इकोनॉमिक झोन (APSEZ) च्या एमडीपदी आहे. तर, त्यांचा धाकटा मुलगा जीत अदानी समुहाच्या डिजीटल उपक्रमांसह भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमानतळाचं नियोजन पाहतो. 

अदानी यांचा पुतण्या प्रणव अदानी या उद्योग समुहाच्या कृषी आणि इंधन उद्योगांचं प्रतिनिधीत्वं करतो. तर, दुसरा पुतण्या, सागर अदानी Adani Group च्या एनर्जी बिझनेस आणि रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट अर्थात पारंपरिक उर्जास्त्रोतांशी संबंधित उद्योगांची जबाबदारी सांभाळतो.