Interesting Facts: 407 वर्षांपासून तंत्रज्ञानाशिवाय 80 फूटावर पोहचतं पाणी; Technique शोधून इंजिनीयर थकले

Interesting Facts: आपल्या या पृथ्वीवर अनेक अशी रहस्य आहेत जी अजून पर्यंत (Mysterious Places on Earth) कोणालाही कळली नाहीत, त्यातून आपल्या देशातही अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचा शोध अद्यापही लागला नाही. काहींचा लागला तर काही गुपितांवर अजूनही पडदा पडायचा बाकी आहे.

Updated: Dec 20, 2022, 09:12 PM IST
Interesting Facts: 407 वर्षांपासून तंत्रज्ञानाशिवाय 80 फूटावर पोहचतं पाणी; Technique शोधून इंजिनीयर थकले title=
khuni bhandara interesting facts

Interesting Facts: आपल्या या पृथ्वीवर अनेक अशी रहस्य आहेत जी अजून पर्यंत (Mysterious Places on Earth) कोणालाही कळली नाहीत, त्यातून आपल्या देशातही अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचा शोध अद्यापही लागला नाही. काहींचा लागला तर काही गुपितांवर अजूनही पडदा पडायचा बाकी आहे. तेव्हा जाणून घेऊया अशाच एका ठिकाणाबद्दल जिथे पाणी वरून खाली नाही तर खालून वर जातं. आपल्या मानवी संस्कृतीतही असे अनेक तंत्रज्ञान प्राचीन काळात होऊन गेले आहेत जे आपल्याला आजही थक्क करून सोडतात. त्यातून जलसंधारण्याच्याही अनेक तांत्रिक गोष्टीचे अनेक वर्षांपुर्वी शोध लागले आहेत. अशी माहिती समोर येते की 407 वर्षांपूर्वी असाच एक प्रयत्न मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये (Burhanpur) झाला होता. कुंडी भंडारा पाहण्यासाठी महापालिकेने लिफ्ट बसवली आहे. याद्वारे लोक 80 फूट खोल विहिरीत उतरतात. तेथून ते इतर कुंडांमध्ये पोहोचतात. ते पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. युनेस्कोच्या (Unesco) जागतिक वारशातही त्याचा समावेश करण्याची मागणी होत आहे. (burhanpur news water supply system water goes 80 feet up without any technology opposite gravity)

काय आहे इतिहास? 

इसवी सन 1615 मध्ये अब्दुरर्हीम खान-ए-खानाने बुहरानपूर येथे कुंडी भंडारा बांधला होता. कुंडी भंडारा जगभर फेमस होता. हा कुंडी भंडारा (Kundi Bhandara) म्हणजे जलसंधारण आणि जलपुरवठ्याची एक अजब योजना आहे जी आजसुद्धा दररोज सुमारे अडीच लाख लोकांची तहान भागवते. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. पण यामागेही एक वेगळा इतिहास आहे. 

खुनी भंडारा का म्हणतात? 

काही इतिहासकारांनी सांगितल्यानुसार, ज्या ठिकाणी हा रक्तरंजित भंडारा बांधला आहे तिथे काही आक्रमकांनी व्यापाऱ्यांच्या गटाला लुटले होते आणि त्याच ठिकाणी त्यांचे मृतदेहही पडले होते त्यामुळे तेथून त्यांचे मृतमेह बाहेर काढताच त्या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह बाहेर आला. याच घटनेमुळे या कुंडी भंडाऱ्याला रक्तरंजित भंडारा किंवा खूनी भंडारा म्हणतात. या कुंडी भंडाऱ्याला अनेक नावं आहेत. काहीजण याला रक्तरंजित भंडारा, नायहरे खरे जरियां म्हणतात तर काहीजण कुंडी का भंडारा (Khuni Bhandara) म्हणतात. 

 

काय सांगतं विज्ञान? 

कुंडी भंडाराभोवती सातपुड्याच्या मोठमोठ्या टेकड्या आहेत ज्यातून पाणी झिरपून त्याच्या मध्यभागी साचते. कोणत्याही पंपिंग सिस्टीमशिवाय हे पाणी वाऱ्याच्या जोरावर 108 कुंडांपर्यंत पोहोचते. ही रचना आजही चालू आहे. येथे सुरू असलेली ही पाण्याची व्यवस्था पुर्णत: गुरूत्वाकर्षणाच्या (Gravity) नियमाच्या विरूद्ध आहे. कोणत्याही पंपाशिवाय अथवा तंत्रज्ञानाशिवाय येथील पाणी हे 80 फूट खोलावरून वर पोहचतेय. हे पाणी वाहताना दिसत नाही तर ते छतावरून टपकत राहते आणि बारीक बारीक पाणी शिपंडल्याप्रमाणे थेंबांप्रमाणे वर जाताना दिसते. असा अजूबा अनेक ठिकाणी पृथ्वीवर पाहायला मिळतो. एके ठिकाणी असा धबाधबा आहे जेथे पाणी वरून खाली नाही तर खालून वर जाते. या कुंडी भंडारात 3.9 किमी प्रवास केल्यानंतर हे थेंब अंतिम कुंडीपर्यंत पोहोचतात आणि वर जमिनीवर जाऊन पडतात.  

काय आहेत वैज्ञानिक गुणधर्म? 

कुंडी भंडाराचे पाणी खनिज पाण्यापेक्षा शुद्ध आहे. विहिरींमध्ये कॅल्शियमचा (calcium) मोठा थर तयार झाला आहे यावरून पाण्याच्या शुद्धतेचा अंदाज लावता येतो. हे पाणी पुर्णत: शुद्ध आहे.