Budget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab

Old vs New Current Income Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फार आशा आहेत. गतवर्षी त्यांच्या हाती निराशा आली होती.   

Updated: Feb 1, 2023, 10:20 AM IST
Budget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab title=

Union Budget 2023-24 LIVE Updates : 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प (Budget 2023) मांडणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निर्मला सीतारामन नेमक्या कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता प्रत्येक क्षेत्राला आहे. दरम्यान नोकरदारांना यावेळी आयकरातून (Income Tax) सवलत मिळेल अशी आशा आहे. मागील अर्थसंकल्पात निराशा झाल्याने यावेळी तरी अर्थमंत्री दिलासा देतील अशी अपेक्षा नोकरदार वर्ग करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 साठी आयकर स्लॅबमध्ये (Income Tax Slab) कोणताही बदल जाहीर केला नव्हता. 

2014 पासून आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2014 मध्ये मूलभूत वैयक्तिक कर सूट मर्यादेत बदल करण्यात आले होते. पण त्यानंतर अर्थमंत्र्यांनी कोणतेही बदल केलेले नाहीत. निर्मला सीतारामन यांनी 2020 चा अर्थसंकल्प सादर करताना एक नवीन करव्यवस्था सादर केली होती. तथापि, नवीन करव्यवस्था करदात्यांना पर्यायी आहे.

नवीन करप्रणाली

- 2.5 पर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
- 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जुन्या तसेच नवीन कर प्रणालीनुसार 5 टक्के कर आकारला जातो.
- 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या वैयक्तिक उत्पन्नावर नवीन नियमानुसार 10 टक्क्यांनी कर आकारला जातो.
- 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर आकारला जातो.
- 10 लाखांच्या वर तीन स्लॅब आहेत
- 10 लाख ते 12.5 लाख रुपयांच्या वैयक्तिक उत्पन्नावर नवीन नियमानुसार 20 टक्क्यांप्रमाणे कर आकारला जातो.
- 12.5 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर आकारला जातो
- 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो.

जुनी करप्रणाली

- 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
- 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जुन्या तसेच नवीन कर प्रणालीनुसार 5 टक्के दराने कर आकारला जातो.
- जुन्या नियमानुसार, 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या वैयक्तिक उत्पन्नावर 15 टक्के कर आकारला जातो.
- 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जुन्या प्रणालीमध्ये 20 टक्क्यांप्रमाणे कर आकारला जातो.
- जुन्या नियमानुसार 10 लाखांपेक्षा जास्त वैयक्तिक उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जात होता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-23 सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.