Budget 2021 : अर्थमंत्री आज तोंड गोड करणार, 10 दिवस कर्मचारी क्वारंटाइन

कोरोनामुळे हलवा तयार करण्याचा सोहळा होणार नाही अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र अर्थमंत्रालयाकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

Updated: Jan 23, 2021, 02:12 PM IST
Budget 2021 : अर्थमंत्री आज तोंड गोड करणार, 10 दिवस कर्मचारी क्वारंटाइन title=

वी दिल्ली: कोरोना काळातील सर्वात पहिलं बजेट यंदा मांडलं जाणार आहे. कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांवर त्याचा कसा परिणाम होईल ते येत्या काही दिवसांत समोर येईल. मात्र दरवर्षी न चुकता अर्थसंकल्पाआधी होणारा हलवा समारोह यंदा होणार की नाही या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याचं कारण म्हणजे आज दुपारी 3.30 च्या सुमारास हलवा समारोह आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या हातानं हलवा तयार करून सर्व कर्मचाऱ्यांचं तोंड गोड करणार आहेत. त्यानंतर बजेट सादर होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी या कर्मचाऱ्यांना 10 दिवस क्वारंटाइन केलं जाणार आहे.

अर्थसंकल्प 2021 1 फेब्रुवारी रोजी सादर केलं जाणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता अर्थ मंत्रालयात हलवा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही परंपरा बर्‍याच काळापासून चालू आहे. संसदेच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अनुराग ठाकूर, अर्थ मंत्रालयाचे सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
 
 यंदा कोरोनामुळे हलवा तयार करण्याचा सोहळा होणार नाही अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र अर्थमंत्रालयाकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला संसदेत बजेट सादर करणार आहेत. त्याआधी आज हलवा तयार करण्याचा सोहळा परंपरेनुसार पार पडणार आहे. 
 
 अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सोहळ्यानंतर बजेटचं काम सुरू होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना 10 दिवसांसाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. बजेट तयार होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसणार आहे.

budget 2021: PM किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणार इतके रुपये 
 
 यंदा ऑनलाइन असणार बजेट
 कोरोनामुळे यंदाच्या बजेटमध्ये एक मोठा बदल होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीनं हे बजेट सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. या बजेटची प्रिंट काढली जाणार नाही. तर सर्वांना सॉफ्ट कॉपी दिली जाणार आहे. आर्थिक समीक्षा 29 जानेवारीला पटलावर ठेवली जाणार आहे. तर 1 फेब्रुवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहात