Prepaid Recharge Plan: जर तुम्ही प्रीपेड मोबाईल प्लान वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या प्लानची किंमत जास्त आहे, असं वाटत असेल तर या प्लानबद्दल जाणून घ्या. आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे जी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या प्लानमध्ये तुम्ही स्वस्तात जास्तीत जास्त चांगला फायदा घेऊ शकता.
आम्ही बीएसएनएलच्या 347 रुपयांच्या प्लानबद्दल बोलत आहोत. या प्लानमध्ये यूजर्सना दररोज 2 GB हाय स्पीड डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता 56 दिवसांची आहे. म्हणजे या प्लानमध्ये यूजरला एकूण 112 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे, वापरकर्त्याला सुमारे 3 रुपयांमध्ये 1 GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जात आहेत.
एअरटेल 2GB डेटा प्लान
एअरटेलच्या 549 रुपयांच्या प्लानमध्ये यूजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अशा प्रकारे, युजरला या प्लानमध्ये एकूण 112GB डेटा मिळतो. याशिवाय एअरटेल एक्सट्रीम मोबाईल पॅक, विंक म्युझिक अपोलो 24X7 सर्कल आणि फ्री हॅलो ट्यून्सची सुविधा देण्यात आली आहे.
जिओ 2GB डेटा प्लान
जिओच्या 533 रुपयांच्या प्लानमध्ये यूजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अशा प्रकारे, युजरला या प्लानमध्ये एकूण 112GB डेटा मिळतो. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडची सेवाही या प्लानमध्ये दिली जात आहे.
VI 2GB डेटा योजना
Vi च्या 539 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अशा प्रकारे, युजरला या प्लानमध्ये एकूण 112GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies & TV आणि Data Delight ची सुविधा दिली जात आहे.