लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Updated: Apr 2, 2018, 10:16 PM IST
लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार... title=

नवी दिल्ली : प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

वधूच्या हाताला मेहंदी लागली, अंगाला हळद लागली होती. लवकरच वधू लग्नबंधनात अडकणार होती आणि नवरदेव तिला आपल्यासोबत घेऊन जाणार होता. पण कुणीच विचार केला नसेल असा प्रकार वधू सोबत घडला.

वधूला घेऊन जाणाऱ्या नवरदेवाने लग्न होण्यापूर्वीच पळ काढला. नवरदेवाने पलायन करण्या मागचं कारणं पैसे असल्याचं बोललं जात आहे.

४ वर्षांपासून रिलेशनशिप

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तरुणाने आपल्या घरा शेजारी राहणाऱ्या युवतीसोबत तब्बल ४ वर्षांपासून प्रेम-संबंध ठेवले. त्यानंतर एके दिवशी कुटुंबियांसोबत चर्चा करुन लग्न करण्याचं ठरलं. मात्र, २९ तारखेला विवाहाच्या दिवशीच नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाच्या कुटुंबियांनी ५ लाखांची मागणी केली.

५ लाख रुपयांपैकी ५०,००० रुपये लग्नापूर्वी आणि उर्वरित पैसे पुढील सहा महिन्यात देऊ असं आश्वासन वधूच्या परिवाराने दिलं. मात्र, ऐन लग्नापूर्वी नवरदेवाच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख बदलण्याची मागणी केली. नवरदेवाची मागणी ऐकूण वधूच्या कुटुंबियांनीही तारीख पुढे ढकलली. मात्र, ठरलेल्या दिवशीही नवरदेव लग्नाला पोहोचला नाही आणि पैसे, दागिने घेऊन फरार झाला.