लग्न होतंय की जिमनॅस्टिकची स्पर्धा? नवरीचा पराक्रम पाहून सगळेच बुचकळ्यात

तिचं असं काही रुप पाहायला मिळतं की कळतंच नाही, आपण आलोय कुठे. 

Bollywood Life | Updated: Jan 25, 2022, 12:10 PM IST
लग्न होतंय की जिमनॅस्टिकची स्पर्धा? नवरीचा पराक्रम पाहून सगळेच बुचकळ्यात  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्नसमारंभांमध्ये गमतीजमती घडल्या नाहीत, तर त्याची रंगत वाढ नाही हेच खरं. कधीकधी या गमतीजमतींचं असं काही रुप पाहायला मिळतं की कळतंच नाही, आपण आलोय कुठे. 

सध्या असंच काहीसं दृश्य एका विवाहसोहळ्यामध्ये पाहायला मिळालं. जिथे नवरीबाईनं जी करामत केली, ती पाहून नेटकरीच काय, खुद्द नवरदेवही हैराण झाला. 

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. 

लाल रंगाचा लेहंगा, हेवी ज्वेलरी, मेकअप असं एकंदर नवरीचं रुप. तर नवरदेवही शेरवानीमध्ये रुबाबात तिच्यासमोर हातात हार घेऊन उभा राहिला. 

तो तिच्या गळ्यात हार घालायला जाणार इतक्यातच ती काहीशी मागे झाली. नवरी मागे झाल्याचं पाहून नवरदेव काहीसा पुढे होऊन त्यानं तिच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न केला. 

इतक्यातच ती आणखी मागे झाली. तीसुद्धा इतकी की जणू हा काटकोन त्रिकोणच. मग काय, नवऱ्यानं हार घालण्याऐवजी हार पत्करल्याचं पाहून ती पुढे आली. 

हे पाहून, नेटकऱ्यांनीही प्रश्न केला अरे इथे लग्न होतंय की जिमनॅस्टिकची स्पर्धा सुरुये? 

'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटवा' या गाण्याची या व्हिडीओला मिळालेली साथ तो गाजण्यामागचं आणखी एक कारण ठरत आहे. 

नवरीनं केलेली ही करामत पाहून परिस्थितीनुसार स्वत:ला वळवण्याचं कसब तिच्यात खऱ्या अर्थानं भिनलंय, अशीच प्रतिक्रिया व्हिडीओ पाहणारे अनेकजण देत आहेत.