ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधानांचा दहशतवादावर भर

चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाच्या मुद्द्यावर विशेष भर देणार आहेत.

Updated: Sep 2, 2017, 12:47 PM IST
ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधानांचा दहशतवादावर भर title=

नवी दिल्ली : चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाच्या मुद्द्यावर विशेष भर देणार आहेत. दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर पाकिस्तानचा विशेष रेकॉर्ड नसल्याचं सांगत, ब्रिक्सच्या मंचावर या विषयावर चर्चेची गरज नाही असं विधान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३१ ऑगस्ट रोजी केलं होतं. 

त्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स संम्मेलनात भारत दहशतवादाचा मुद्दा प्रबळपणे उचलणार आहे. चार सप्टेंबरला ब्रिक्सचं शिखर संम्मेलन होत आहे. या संम्मेलनात सहभागी होण्यासाठी, नरेंद्र मोदी उद्या चीनला रवाना होतील. संम्मेलनानंतर मोदी चीनहून मॅनमारला जातील आणि सात सप्टेंबरला मायदेशी परततील.