Breaking News: राजधानीत आणखी चार जणांना ओमायक्रोनची बाधा

Omicron कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे आणखी चार रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Dec 14, 2021, 01:09 PM IST
Breaking News: राजधानीत आणखी चार जणांना ओमायक्रोनची बाधा title=

नवी दिल्ली : Omicron कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे आणखी चार रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Omicron threat) दिल्लीत ओमायक्रोनच्या आणखी चार जणांची भर पडल्याने दिल्लीत आता एकूण 6 रुग्ण झाले आहेत.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendar Jain) यांनी आज  माहिती दिली की राष्ट्रीय राजधानीत ओमायक्रोनचे चार नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. यासह, दिल्लीतील नवीन रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, सहा प्रकरणांपैकी, एका रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे जैन म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सध्या 35 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आणि ओमायक्रोनचे तीन संशयित रुग्ण एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.