LIC ची नवीन विमा पॉलिसी धन रेखा! या योजनेचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील अशा विमा कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. ही कंपनी सरकार चालवते आणि वेळोवेळी चांगल्या योजना समोर आणत असते.

Updated: Dec 14, 2021, 12:32 PM IST
LIC ची नवीन विमा पॉलिसी धन रेखा! या योजनेचे जबरदस्त फायदे जाणून घ्या title=

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC वेळोवेळी ग्राहकांसाठी उत्तम योजना देत आहे. LIC ही देशातील सर्वोत्तम विमा कंपन्यांपैकी एक आहे. ज्यामध्ये जोखीम न घेता गुंतवणूक करता येते, म्हणजेच येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. वास्तविक ही कंपनी सरकार चालवते. आता LIC ने एक जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेबद्दल जाणून घेऊया.

LIC Dhan Rekha Policy

एलआयसीने सांगितले की, या विमा पॉलिसीचे नाव 'Dhan Rekha' आहे. यामध्ये, पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल. म्हणजेच ही योजना तुम्हाला मोठे फायदे देणार आहे.

हेदेखील वाचा - 7th Pay Commission  केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेंशन योजनेचा फायदा; सरकारने दिली ही माहिती

पॉलिसीसाठी पात्रता काय आहे?

या पॉलिसीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला आधीच मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. या योजनेत किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम गुंतविली जाऊ शकते.

त्यात गुंतवणुकीसाठी दिलेल्या अटींनुसार 90 दिवसांपासून ते आठ वर्षापर्यंतच्या मुलाच्या नावावर घेता येते. त्याचप्रमाणे, कमाल वयोमर्यादा देखील 35 वर्षे ते 55 वर्षे आहे.

योजना 3 टर्ममध्ये सुरू केली

  • कंपनीने ही योजना 3 वेगवेगळ्या अटींसह आणली आहे.
  • यामध्ये 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षे या तीन टर्म आहेत.
  • त्यातून तुम्ही कोणतीही एक योजना निवडू शकता.
  • तुम्हाला मुदतीनुसार प्रीमियम रक्कम भरावी लागेल.
  • जर तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीची निवड केली तर तुम्हाला 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
  • तुम्ही 30 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 15 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
  • तुम्ही 40 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 20 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
  • याशिवाय, तुम्ही सिंगल प्रीमियम देखील भरू शकता.

LIC, Lic Scheme, Dhan Rekha Plan, Life Insurance Plan, Life Insurance Plan Dhan Rekha,