भाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी

भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी  भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

Updated: Mar 12, 2020, 01:07 PM IST
भाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी माजी महापौर आणि राज्य उपाध्यक्ष भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विधानपरिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांचे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. अखेर खडसेंना उमेदवारी मिळाली नाहीच.

सध्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष आहे. पेशाने डॉक्टर असणारे भागवत कराड यांची वंजारी समाजाचा नेता म्हणून ओळख आहे. औरंगाबाद भाजप मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून ही उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात.

डॉ. भागवत कराड हे मराठवाड्यातील भाजपचे नेते आहेत. भागवत मराठवाडा विकास मंडळांचे अध्यक्षपदी होते. तसेच ते महापौर, उपमहापौर, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत. २०१०-२०१३ मध्ये भाजपच्या भटके विमुक्त मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे.- नवचेतनाच्या फार्माचे चेअरमन आणि भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, धन्वंतरेय एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आहेत.

दरम्यान, राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. चौथ्या जागेसाठी अजूनही काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरला. मात्र, राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी काल अर्ज भरला नाही.  चौथ्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होऊन उमेदवार ठरवला जाणार आहे.

0