नवी दिल्ली : मध्य प्रदेश काँग्रेसमधील मोठं नाव आणि माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सिंधिया यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पुढील राजकीय कारकिर्दीसाठी आशावादी असल्याचं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला.
नव्या नेतृत्वाचा काँग्रेसमध्ये वाव मिळतनसल्याचा सूर आळवणाऱ्या सिंधिया यांना भाजपमध्ये प्रवेश करतात एक खास भेट मिळाली आहे. ही भेट म्हणजे राज्यसभेसाठीची उमेदवारी. पक्षप्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांनीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिंधिया यांचं अभिनंदन करत त्यांच्या राज्यसभा उमेदवारीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं.
सिंधिय़ा यांच्यासोबतच मध्य प्रदेश भाजपच्या वतीने हर्ष सिंह चौहान यांच्या नावेही राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. ज्यामुळे आता भाजमध्ये जाताच सिंधिया यांचे 'अच्छे दिन' सुरु झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
Former MP CM & BJP leader Shivraj Singh Chouhan: I congratulate Jyotiraditya Scindia and Harsh Singh Chauhan on being named Rajya Sabha candidates from Madhya Pradesh pic.twitter.com/1DQ0EfAFtk
— ANI (@ANI) March 11, 2020
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सिंधिया यांनी देशाचं भविष्य मोदींच्या हातांमध्ये सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. सोबतच जनसेवेसाठीच आपण प्रयत्नशील असू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसकडून जनतेला दिलेली अनेक आश्वासनं पाळली गेली नसल्याचं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन कागदोपत्रीच असल्याचं सांगत तरुण पिढीत रोजगाराच्यागी संधी नसल्याचं वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवत रोजगाराला संधी नसली तरीही भ्रष्टाचाराला मात्र पक्षात वाव आहे असं म्हणत त्यांनी यावेळी काँग्रेसप्रती नाराजी व्यक्त केली होती.