नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसून अजहरचा उल्लेख चक्क मसूद अजहरजी असा केला आहे. ते दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पुलवामा हल्ल्यात मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांनी भाजपला आयतं कोलीत हातात दिलं आहे. दिल्लीमध्ये बूथ अध्यक्षांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अजहरला जी असं म्हटलं. त्यानंतर भाजपकडून लगेचच राहुल गांधींवर टीका सुरु झाली आहे.
देश के 44 वीर जवानों की शहादत के लिए जिम्मेदार आतंकी संगठन जैश-ए-मोहम्मद के सरगना के लिए राहुल गांधी के मन में इतना सम्मान! #RahulLovesTerrorists pic.twitter.com/I8a9FY60cW
— BJP (@BJP4India) March 11, 2019
#WATCH Rahul Gandhi in Delhi: You would remember that during their(NDA) last Govt, current National Security Advisor Ajit Doval went to Kandahar to hand over Masood Azhar. pic.twitter.com/xTErFR6rjV
— ANI (@ANI) March 11, 2019
एनएसए अजीत डोवाल यांच्यावर टीका करत असताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या बसवर कोणी बॉम्ब फोडला. जैश-ए-मोहम्मद...मसूद अजहरने... तुम्हाला आठवण करुन देतो. हा तोच मसूद अजहर आहे ज्याला 56 इंच वाल्यांची सरकार असताना विमानात बसून मसूद अजहरला सोडण्य़ासाठी अजीत डोवाल कंधारला गेले होते.'