उमेदवारांविरुद्ध 'या' अ‍ॅपवर तक्रार करता येणार

तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत कारवाई करण्यात येणार.  

Updated: Mar 11, 2019, 05:50 PM IST
उमेदवारांविरुद्ध 'या' अ‍ॅपवर तक्रार करता येणार title=

नवी दिल्ली: मतदारसंघातील उमेद्वाराची योग्य माहिती प्राप्त व्हावी, म्हणून आयोगाने नवीन अॅपचे लॉन्चिंग केले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिक त्यांच्या भागातील उमेद्वाराविरुद्ध तक्रार करता येणार आहे. या अॅपला cVIGIL असे नाव देण्यात आले आहे. हा अॅप प्लेस्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती आयोगाला प्राप्त व्हावी, यासाठी आयोगाने cVIGIL हे मोबाईल अ‍ॅप केले लाँच केले आहे.  गुगल प्लेस्टोरमधून cVIGIL हा अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर संबधित व्यक्तीला मोबईल नंबरसह त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार. त्यानंतर याची अधिकृत नोंदणी होईल. तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे.  

मतदारांची उमेदवारांविषयी तक्रार असल्यास ते या अ‍ॅपवर फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवू शकणार आहेत. उमेद्वाराच्या गैरप्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ असल्यास त्याला मोठा पुरावा म्हणून पाहिलं जाईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट फोनचा कॅमेरा चालू करून व्हिडिओची रेकॉर्डिंग करू शकतात. त्याचबरोबर फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवण्याची सोय उपलब्घ करुन देण्यात आली आहे. तसेच अ‍ॅपमधून निवडणूक आयोगाला ठिकाणाची माहितीही देता येणार आहे. जर कोणत्या ठिकाणी उमेदवारांकडून नियमांचा भंग होत असल्यास, हे सर्व रेकॉर्ड करता येवू शकते. या अ‍ॅपमध्ये एक डिस्क्रिप्सन बॉक्स असून यात मतदार काही माहिती टाईप करू शकतात. यात किती जणांनी तक्रार केली? किती तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली? याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला मिळणार आहे.