अॅट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याची भाजप खासदाराची मागणी

अॅट्रॉसिटीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी

Updated: Sep 4, 2018, 02:23 PM IST
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याची भाजप खासदाराची मागणी title=

नवी दिल्‍ली : देवरिया येथून भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या कायद्याबाबत सरकारने पुन्हा एकदा विचार करावा असं त्यांनी म्हटलं आहे. या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

कलराज मिश्र यांनी म्हटलं की, 'सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन याबाबत चर्चा केली पाहिजे. ज्यामुळे कोणत्याचा वर्गाला त्रास नाही होणार. ब्राह्मण आणि सवर्ण सोबतच इतर मागासवर्गीय समाज देखील यावर नाराज आहे. लोकांकडून तक्रारी येत आहेत. लोकं हैराण झाले आहेत. फैजाबादमध्ये एका ब्राह्मणाच्या संपूर्ण कुटुंबाला खोटा आरोप करुन अटक केली आहे. अधिकारी देखील यामध्ये भीतीने काहीही करु शकत नाही आहेत. निर्दोष लोकांना देखील यामध्ये फसवलं जात आहे.'

दुसरीकडे आज केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने सगळ्या खासजी टीव्ही वाहिन्यांना 'दलित' शब्‍द न वापरण्याचे आदेश दिले आहेत. 'दलित' शब्‍दाच्या वापरावर मुंबई हायकोर्टाने बंदी घातल्यानंतर माहिती प्रसारण मंत्रालयाने देखील या शब्दाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दलित ऐवजी अनुसूचित जाती या शब्‍दाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.