हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं

हवाई दलाचं विमान कोसळलं

Updated: Sep 4, 2018, 12:19 PM IST
हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं title=

जोधपूर : हवाई दलाचं मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचं विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर आला.

हवाई दलाचं मिग-27 हे विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. विमान जमिनीवर कोसळताच त्याचा स्फोट झाला. यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विमानाचा अपघात का झाला यामागचं कारण अजून कळालेलं नाही.