नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार पन्ना लाल यांनी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इटली लग्न केल्याने त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
एएनआयनुसार. आमदार पन्ना लाल म्हणाले की, ‘विराट कोहली आणि अनुष्का शर्माने भारतात लग्न का केलं नाही? इटलीत जाऊन लग्न करण्याची काय गरज होती?. पन्ना लाल पुढे म्हणाले की, ‘त्यांचे लाखों लोक चाहते आहेत. ते जगभरात भारताचं प्रतिनिधीत्व करतात. मग त्यांनी भारतात लग्न का केलं नाही?
सोशल मीडियात आमदार पन्ना लाल यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात पन्ना लाल म्हणताहेत की, या देशात भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, विक्रमादित्य तसेच युधिष्ठिर यांचं लग्न झालं. तुमचं आमचंही इथेच झालं, पण ते लग्नासाठी परदेशात गेले. ते अरबो रूपये इथून कमावतात, लोकप्रियता मिळवतात आणि परदेशात गेले.
He is loved by millions, he represents India on the world stage, why did he not hold his wedding ceremony in India? This is not 'rashtra bhakti': Panna Lal, Madhya Pradesh BJP MLA pic.twitter.com/MsCD87U4qM
— ANI (@ANI) December 19, 2017
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला इटलीमध्ये शानदार सोहळ्यात लग्न केलं. या लग्नापासून मीडियाला दूर ठेवण्यात आलं होतं. आता येत्या २१ डिसेंबरला दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. आता या आमदारांचं हे हास्यास्पद वक्तव्य सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.