'ओला' आता फूड डिलिव्हरीही करणार!

आत्तापर्यंत तुम्हाला प्रवासात उपयोगी ठरणारी 'ओला' ही कंपनी लवकरच तुम्हाला फूड डिलिव्हरीही करताना दिसू शकते. 

Updated: Dec 19, 2017, 08:10 PM IST
'ओला' आता फूड डिलिव्हरीही करणार! title=

मुंबई : आत्तापर्यंत तुम्हाला प्रवासात उपयोगी ठरणारी 'ओला' ही कंपनी लवकरच तुम्हाला फूड डिलिव्हरीही करताना दिसू शकते. 

'ओला'नं फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये उतरण्यासाठी फूड ऑर्डरिंग स्टार्ट-अप फूडपांडा इंडियाला १३३० करोड रुपयांत खरेदी केलंय. 'उबर ईटस्'ला टक्कर देण्यासाठी 'ओला'नं ही इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं म्हटलं जातंय. 

'एएनआय टेक्नोलॉजिज लिमिटेड'कडे ओलाची जबाबदारी आहे. कंपनीच्या प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी हे पाऊल उचलल्याचं ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी म्हटलंय. 

'फूडपांडा इंडिया' सध्या भारतात १५ हजार रेस्टॉरन्टसोबत हातमिळवणी करत फूड डिलिव्हरी करत आहे. गेल्या वर्षी या कंपनीला १४२.६४ करोड रुपयांचा तोटा झाला होता... यंदा हा तोटा कमी होऊन ४४.८१ वर आलाय.