भाजपा नेत्यानं ४५ दिवस लैंगिक शोषण करत बनवला अश्लिल व्हिडिओ

तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी दबाव आणत असल्याचे पिडिता आणि तिच्या नातेवाईकांनी म्हटलंय. 

Updated: Jul 21, 2018, 01:00 PM IST
भाजपा नेत्यानं ४५ दिवस लैंगिक शोषण करत बनवला अश्लिल व्हिडिओ  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये एका महिलेने स्थानिक भाजपा नेत्यावर बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनविण्याचा आरोप केलायं.  या प्रकरणात पोलिसांचा बेजबाबदारपणाही समोर आलायं. पोलिसांनी भाजपा नेत्याविरूद्ध तक्रार दाखल तर केली पण कोणती कारवाई केली नसल्याचा आरोपही पिडितेने केलायं. पिडिता रायबरेलीच्या लालगंज ठाणे क्षेत्रात राहते. पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने तिने एस.पी कार्यालयात धाव घेतली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी दबाव आणत असल्याचे पिडिता आणि तिच्या नातेवाईकांनी म्हटलंय.

पोलिसांवर दबाव

भाजपाच्या तिकिटावर नगर पंचायत अध्यक्ष पदाची निवडणुक लढविलेल्या निर्लेश सिंह साधारण दीड महिने लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप पिडितेने केलाय. एवढच नव्हे तर लैंगिक शोषण करतानाचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याचेही तिचे म्हणणे आहे. हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो देत असल्याचे पिडितेने तक्रारीत म्हटलंय.  पोलिसांनी १६ जुलैला निर्लेश सिंहच्या विरूद्ध तक्रार दाखल केली पण भाजपा नेत्याच्या दबावामुळे आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. 

आत्मदहनाचा इशारा 

आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही सहपरिवार एस.पी कार्यालासमोर आत्मदहन करू असा इशारा पिडितेच्या पतीने दिलाय. पोलीस याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास टाळत आहेत.