भाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा

 भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2018, 02:03 PM IST
भाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा title=

हैदराबाद : आंध्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष कंभमपाटी हरिबाबू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय. के. हरिबाबू राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याबद्दल वेगळीच चर्चा आहे. भाजप आपल्या पक्षात बदल करत आहे. तसेच नव नवीन योजना आणण्यासाठी त्यांना भाजपकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून सागण्यात येत आहे. के. हरिबाबू यांनी भाजपमधील वरिष्ठ पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टीडीपीपासून फारकत, भाजपची रणनीती

तेलुगू देशम  पार्टीने भाजपची साथ सोडल्याने या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे भाजपने आंध्र प्रदेशमधील आपल्या कार्यकारणीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच येथे पक्षाला अधिक पकड मजबूत करण्यासाठी वेगळी रणनीती आखायची आहे. त्यामुळे भाजपकडून के हरिबाबू यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या या धक्कातंत्रामुळे प्रदेश भाजपमध्ये राजकीय भूकंप झालाय.

कापू समाजाला प्रतिनिधीत्व

एमएलसी सोमू वीर राजू, आमदार आणि माजी मंत्री पी मानिकला राव, माजी काँग्रेस नेते कन्ना लक्ष्मीनारायण आणि यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री डी पुरंदेश्वरी यांच्यापैकी एकाला प्रमुख पदाचे दावेदार मानले जात आहे. लक्ष्मीनारायण आणि पुरंदेश्वरी या दोघांनी काँग्रेसचा हात सोडत २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, कापू समाजातून आलेले सोमू वीर राजू आणि पी मानिकला राव यांना आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष पद मिळू शकते किंवा त्यांना प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. दरम्यान, कापू समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येण्याची शक्यता अधिक आहे.

माजी काँग्रेस नेत्यांचा काँग्रेस विरोध वापर

आंध्र प्रदेशात काँग्र आणि अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना काँग्रेसविरोधात उतरविण्याचा भाजपचा डावपेच आहे. त्यातून विरोधकांना मात देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळे केहरिबाबू यांचा राजीनामा घेतल्याचे म्हटले जात आहे.