वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक

दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो.

Updated: Jul 5, 2022, 07:56 PM IST
वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक title=

मुंबई : दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो. यामध्ये चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघाताची संख्या जास्त आहे. त्यामुळे चालकाने जर मनावर ताबा आणि संयम ठेवला तर असे अपघात कमी करता येतात. परंतु आज कालची तरुण मंडळी ही आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत.

परंतु यामुळे ते फक्त स्वत:चंच नाही तर दुसऱ्याचं देखील नुकसान करतात. यासंदर्भात तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे असे व्हिडीओ आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात.

सध्या अशाच एका गाडी चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका बाईकची स्कूटर चालकारा जोरदार धडक होते, यामध्ये बाईकचा धोकादायक अपघात होतो. हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये दोन्ही चालकाची खूप मोठी चूक आहे. 

हा व्हिडीओ एकदा तुम्ही पाहाच...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा एका मुलीला मागे बसून वेगाने बाइक चालवत आहे. त्यावेळी त्यांच्या रस्त्यात एक स्कुटीवाला येतो, ज्यामुळे त्याच्या बाईतचा तोल जातो, ज्यामुळे तरुण आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणीचा अपघात झाला.

या घटनेसाठी स्पीडमध्ये गाडी चालवणारा तरुण आणि ओलांडताना निष्काळजीपणा दाखवणारा स्कुटीवाला दोघांचीही चुक आहे.

हा व्हिडीओ mujahidpathan987 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.