Shocking News : बिहारमधून (Bihar News) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये एका लग्नसोहळ्याचा (wedding) आनंद काही क्षणच टिकला. काही वेळापूर्वीच नवरी झालेली तरुणी क्षणातच विधवा झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भागलपूरमध्ये एका लग्न समारंभात लग्नानंतर काही तासांतच वराचा मृत्यू झाल्याने गोंधळ उडाला. पेशाने अभियंता असलेला तरुण आपल्या पत्नीला घेऊन घरी जाणार होतात. तितक्यातच तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरदेवाच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली.
हाताची मेहंदी सुकण्याआधीच नववधू विधवा झाली. बुधवारी रात्री खंजरपूर येथील झावा कोठी येथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर विनीत प्रकाशचे झारखंडमधील पश्चिम सिंहभूम येथील आयुषीसोबत लग्न झाले. लग्नानंतर वधूला निरोप देण्यापूर्वीच विनीतचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वधूची रडून माझी अवस्था वाईट झाली आहे. डॉक्टरांनी हृदय फुटल्यामुळे विनीतचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. वैद्यकीय भाषेत याला heart rupture म्हणतात.
दिल्लीत सॉफ्टवेअर अभियंता असलेला विनीत प्रकाश त्याच्या लग्नाच्या दिवशी खूप आनंदात होता. बुधवारी रात्रीच त्याचे लग्न पार पडले होते. लग्नमंडपात विवाह सोहळा पार पडला आणि सर्वजण आनंदी झाले. दोघांनीही एकमेकांना जयमाला घालतल्या. लग्नानंतर मुलगा आणि मुलीचे कुटुंबीय गप्पा मारत होते. नववधूला घेऊन जाण्याची वेळ आली. पण नियतीच्या मनात दुसरचं काही होतं. सकाळी आठ वाजता वऱ्हाडी निघण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी विनीतच्या छातीत अचानक तीव्र वेदना झाल्या आणि तो खुर्चीवरून खाली पडला. कुटुंबीयांनी त्याला मायागंज रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला पाहताच मृत घोषित केले. यानंतर दोन्ही कुटुंबात गोंधळ उडाला. काही वेळापूर्वीच घरी जाण्यासाठी निघालेली आयुषी रुग्णालयात पोहोचली अन् विनीतला पाहताच खाली कोसळली.
छातीत दुखत असल्याची केली होती तक्रार
लग्नाच्या एक दिवस आधी विनितच्या छातीत दुखत होते. याबद्दल त्याने नातेवाईकांना सांगितले होते. कुटुंबियांनी त्याला अॅसिडिटी झाल्याचे समजून औषध दिले. मात्र मायागंज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, दिलीपला हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्याच्या हृदयाचा पडदा सर्वत्र रक्ताने भरला होता. यामुळे जागीच विनीतचा मृत्यू झाला.
साथ द्यायची नव्हती तर आयुष्यात आलाच का?
विनीत आणि 25 वर्षीय आयुषीचा भागलपूरमधील मातेश्वरी विवाह भवनमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. संपूर्ण रात्र आनंदात गेली. सर्व विधींचा नातेवाईकांनी आनंद घेतला. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चहाची वाट पाहत बसलेल्या विनीतच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेदनेने ओरडत तो खुर्चीवरून खाली पडला. नातेवाईकांनी बेशुद्ध विनीतला रुग्णालयात नेले. मात्र मृत्यू झाला होता. विनीतच्या मृत्यूची बातमी कळताच आयुषीच्या पायाखालची जमिनच सरकली.