अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक, २ शिक्षकांसह १५ मुलांकडून बलात्कार?

 पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर हे प्रकार पुढे आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. 

Updated: Jul 7, 2018, 11:10 AM IST
अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक, २ शिक्षकांसह १५ मुलांकडून बलात्कार? title=

लखनऊ: बिहारमधील छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. येथील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेचे मुख्याध्यापक, २ शिक्षक आणि इतर १५ मुलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हे १८ जण आपल्यावर सहा महिने सातत्याने बलात्कार करत होते. तसेच, त्यांनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ काढून त्याद्वारेही आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर हे प्रकार पुढे आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. 

मुख्याध्यापकासह, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही अटक

घटना आहे छपरा जिल्ह्यातील परसागड गावातील. येथील मुलीने आपल्यावरील अत्याचाराविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपेश्वर बाल ग्यान निकेतनचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि दोन मुलांना अटक केली आहे. डिसेंबर २०१७ पासून आपल्यावर अत्याचार सुरू होते. २०१७मध्ये वर्गातच शिकणाऱ्या एका मुलाने आपल्यावर बलात्कार केला. या घटनेचे त्याने मोबाईलद्वारे चित्रिकरणही केला. तेव्हापासून हा अत्याचार सुरू होता, असेल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कुंपनानेच खाल्ले शेत

मोबाईलद्वारे केलेल्या व्हिडिओ चित्रकरणाचा फायदा घेत 'त्या' मुलाने आपल्यावर वारंवार बलात्कार केला. पण, त्यानंतर इतरही पाच विद्यार्थ्यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केला. त्या मुलांचा त्रास वारंवार वाढू लागल्यानंतर त्रासाला कंटाळून मी शाळेचे मुख्याध्यापक उदय कुमार उर्फ मुकुंद सिंह यांच्याकडे तक्रार केली. पण, मला न्याय देण्याऐवजी त्यांनी स्वत: आणि इतर दोन शिक्षाकांनीच माझ्यावर बलात्कार केला, आसा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.

पीडितेची वैद्यकीच चाचणी

दरम्यान, छापराचे पोलीस प्रमुख किशोर रॉय यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली आहे. मात्र, वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. हा अहवाल आल्यावर पोलीस तपासाला गती येणार आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर शनिवारी हजर करण्यात येणार आहे.