Ration Card : ...तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम काय?

Ration Card Latest Rules :  सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत.   

Updated: Sep 26, 2022, 06:24 PM IST
Ration Card : ...तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम काय?  title=

Ration Card Latest Rules : सर्वसामांन्यांना सरकारकडून स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) कोरोना काळात अनेक महिने मोफत अन्नधान्य देण्यात आलं. मात्र आता सरकारच्या हाती मोठी आकडेवारी लागली आहे. यानुसार मोफत शिधा घेण्यास अपात्र असलेले रेशन कार्डधारकही गैरफायदा घेत आहेत. सरकारच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र रेशन कार्डधारकांवर कारवाई करणार असल्याची चर्चा होती. मात्र अद्याप तरी तसं काही झालेलं नाही. मात्र यानंतरही तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तर एकदा योजनेची पात्रता काय आहे, हे नक्कीच जाणून घ्या. तसेच कोणत्या परिस्थितीत रेशन कार्ड जमा करायचं, याबाबतही आपण जाणून घेऊयात. (big news for ration card holders follow rule else cancel your card know what is rule)

नियम काय आहे?

सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत. त्यानुसार रेशन कार्डधारकाकडे स्वकमाईने खरेदी केलेलं 100 वर्ग मीटरचं फ्लॅट-घर, चारचारी-ट्रॅक्टर, शस्त्राचा परवाना नसावा. तसेच गावात 2 आणि शहरात 3 लाख रुपयांपेक्षा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नसावं. सरकारने दिलेल्या अटीत जर नसाल, तर तुम्ही मोफत रेशन घेण्यास पात्र आहात. मात्र तसं नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड जमा करावं लागेल. 

सरकार काय म्हणतंय?

सरकारकडून आतापर्यंत तरी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर अजूनही कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही, असं उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलंय. मात्र वेळोवेळी सरकारकडून अपात्र असलेल्या रेशन कार्डधारकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. सरकारकडून लाभार्थ्यांची यादी तयार आहे. मात्र वसूलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.