सेंसेक्सला 60 हजारी मुकुट; राकेश झुनझुनवाला म्हणतात 'आणखी वाढणार बाजार'

शुक्रवारी शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांकी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला. मार्केटचे बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी बाजारात अजुनही तेजीची शक्यता वर्तवली आहे.

Updated: Sep 25, 2021, 11:16 AM IST
सेंसेक्सला 60 हजारी मुकुट; राकेश झुनझुनवाला म्हणतात 'आणखी वाढणार बाजार' title=

मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांकी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला. मार्केटचे बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी बाजारात अजुनही तेजीची शक्यता वर्तवली आहे.

दिल है की मानता नही.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला म्हणाले की, सेंसेक्सने 60 हजारी टप्पा गाठणे ही एक संख्या आहे. परंतु दिल है की मानता नही, बाजार है की रुकता नही.

गेल्या काही वर्षात देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत. मोदी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी सारख्या सुधारणा केल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतोय तसेच शेअर मार्केट देखील बुलिश आहे. यापुढे देखील सुधारणा होणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला चांगले बनवण्यासाठी अनेक योजना आहेत. सरकार सार्वजनिक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करीत आहे. यामुळे कॉर्पोरेट सेक्टरचा विस्तार होईल. असेही झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.

याशिवाय देशात सामाजिक स्तरावर देखील बदल होत आहेत. सरकारने प्रत्येक नागरिकांसाठी वीज, गॅस, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे देशातील मोठा गट पुढे येऊन जीडीपी वाढवण्यास मदत करेल.
अमेरिकेत वापरली जाणारी 45 टक्के औषधं भारतातून निर्यात होतात. आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट वाढला आहे. भारताचा बाजार पुढील 10 ते 15 वर्ष थांबणार नाही.  बाजार आणखी वाढेल याबाबत आम्ही आशावादी आहोत.