रायपूर : छत्तीसगढमधील रायपूर येथे मोठी घटना घडली आहे. रायपूर येथे रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱ्या एका रेल्वेमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सीआरपीएफचा एक जवान गंबीर जखमी झाल्याचं कळत आहे. शनिवारी सकाळी 6 वाजण्य़ाच्या सुमारास ही घटना घडली. प्लॅटफॉर्मवर रेल्वे उभी असतानाच ही घटना घडल्याची माहिती समोर य़ेत आहे.
पोलीस प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये झालेल्या या स्फोटानंतर जखमी जवानांपर्यंत तातडीने बचावकार्य पोहोचवण्यात आलं. शिवाय सदर घटनेनंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षाही वाढवण्यात आली. या घटनेमध्ये इतर कोणत्याही प्रवाशांना इजा झाल्याची कोणतीही माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार डेटोनेटर फुटल्यामुळे हा स्फोट झाला.
रायपूर रेल्वे स्थानकावर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असणाऱ्या रेल्वेमध्ये स्फोट झाला. सीआरपीएफच्या 211 बटालियनचे जवान खास रेल्वेनं चालले होते. या घटनेमध्ये काडतूसं एका बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती. सामान रेल्वेच्या बोगीमध्ये ठेवताच तेथे स्फोट झाला.
सीआरपीएफचे जवान रेल्वेमध्ये असताना बाथरुमपाशी असणारा डेटोनेटर फुटला. पण, सहा जवान यात जखमी झाले. अपघात झाल्यानंतर तेथे जवानांना रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर 7.15 मिनिटांनी रेल्वे पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. यावेळी सीआरपीएफचे डीआयजीसुद्धा रेल्वे स्थानकावर पोहोचले.