नवी दिल्ली : रेल्वेचं रिझर्व्हेशन रद्द केल्यावर आपल्या मूळ रक्कमेतून बराच मोठा हिस्सा कापला जात असल्याचं गेल्या काही दिवसात तुमच्या लक्षात आलं असेल. बातमी याच मोठ्या हिश्यातून रेल्वेला झालेल्या उत्पन्नाची आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात आरक्षण रद्द केल्यावर रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम 14 हजार कोटींच्या वर पोहचली आहे.
2015 मध्ये रेल्वेनं रद्दीकरणाचं शुल्क दुपटीनं वाढवलं होतं. तेव्हापासून रेल्वेच्या तिजोरीत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न गोळा होऊ लागलं आहे. 2015-16 मध्ये रद्द आरक्षित तिकाटांच्या माध्यमातून रेल्वेला ११ हजार कोटीं तर त्याआधीच्या वर्षी हे उत्पन्न 9 हजार कोटीं रुपयांच्या आसपास होतं. माहितीच्या अधिकारात ही माहिती पुढे आली आहे.