जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorism in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.  

Updated: Feb 5, 2022, 08:09 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   title=
संग्रहित छाया

श्रीनगर : Terrorism in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

झाकुरा भागात सुरक्षा दलाची मोठी कारवाई

श्रीनगरच्या झाकुरा भागात दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांने मोठी कारवाई सुरु केली आहे. आयजीपी काश्मीरच्या म्हणण्यानुसार, ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव इखलाक हजम असे आहे. हसनपोरा अनंतनाग येथील अली मोहम्मद यांच्या हत्येत त्याचा हात होता. त्यांच्याकडून 2 पिस्तुलांसह इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलांना 

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील जाकुरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. या माहितीवरुन श्रीनगर पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरु केली. श्रीनगर पोलीस दहशतवाद्यांच्या लपण्याच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोघांमध्ये चकमक सुरु झाली.

शोपियान जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा 

उल्लेखनीय आहे की, यापूर्वी बुधवारी शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील नौपोरा भागातील नदीगाम गावाला वेढा घातला आणि तेथे शोध मोहीम सुरु केली. यादरम्यान चकमक सुरु झाली, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी त्याच्या एका ओव्हरग्राउंड कामगारालाही अटक केली आहे.