भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

पलक आणि महाराजांचा मोबाईल डेटा रिकवर केल्यानंतर दोघांची अश्लिल चॅटींग आणि विनायकशी झालेली बोलणी समोर आली.

Updated: Jan 19, 2019, 10:56 AM IST
भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक  title=

इंदोर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक पुराणिक नावाच्या तरुणीला कलम 306, 384 आणि 34 अंतर्गत अटक केली आहे. भैयू महाराज आत्महत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. पलकने प्रेम संबंध बनवून भैयू महराजांकडून लाखो रुपये लूटले होते. त्यांच्यावर लग्नासाठी तरुणी दबाव टाकत होती. पोलिसांनी तीन आरोपींना कोर्टासमोर हजर करत पोलिसांत पाठवले आहे. 

भैय्यू महाराजांनी गेल्या वर्षी 12 जूनला घरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीला पलक पुराणिक आणि सेवक विनायक दुधळे, शरद देशमुख ब्लॅकमेल करुन त्रास देत होते असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. पहिली पत्नी माधवीच्या मृत्यूनंतर पलक महाराजांच्या आयुष्यात आली. काही काळ त्यांच्यासोबत घालवल्यावर महाराजजींच्या एकटेपणाचा तिने फायदा उचलत त्यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. महाराजांच्या कपाटातच ती आपले कपडे ठेवत असे. तिने महाराजांचा अश्लिल व्हिडीओ देखील तयार केला होता. तसेच व्हॉट्सअॅपवर ती महाराजांशी अश्लिल चॅटींग देखील करत असे. 

याच दरम्यान महाराजजींना शिवपुरी येथे राहणाऱ्या आयुषीसोबत प्रेम झाले आणि त्यांनी 17 एप्रिल 2017 ला लग्न केले. पलकला ही माहिती कळताच तिने आपल्यासोबत लग्न करण्यासाठी भैयूजींवर दबाव टाकला. महाराजांनी याला विरोध केला. तिने महाराजांना एक वर्षाचा वेळ दिला.  या दरम्यान बहिण्याच्या लग्नाच्या नावाखाली तिने त्यांच्याकडून लग्नाचे कपडे, ज्वेलरी, मोबाईलच्या नावाखाली जवळजवळ 25 लाख रुपये घेतले. पलकने महाराजांना दिेलेला एक वर्षाचा अवधी 16 जूनला संपणार होता अशी माहिती एएसपी प्रशांत चौबे यांनी दिली. 

ब्लॅकमेलींगच्या षडयंत्रामध्ये सेवक विनायक आणि शरद देखील पलक सोबत होते. पलक पासून पाठ सोडण्याचा महाराजजींनी खूप प्रयत्न केला. मोबाईल नंबर बदलून ते खोलीत लपूनही राहायचे. पण विनायक वेळ साधून पलकला कॉल करायचा. दुष्कृत्याची तक्रार दाखल करायची धमकी तो महाराजजींना द्यायचा. महाराज घाबरुन पलकशी फोनवर बोलायचे. तोंड बंद करण्याच्या अटीवर तो लाखो रुपये घेऊन जायचा. महाराजांना अनेक आजार होते हे देखील तपासात समोर आले आहे. विनायक आणि पलक त्यांना औषधे द्यायचा. विनायक त्यांना शारिरीक रुपाने कमजोर करण्याच्या गोळ्या द्यायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. 

अश्लिल चॅटींग

पलक आणि महाराजांचा मोबाईल डेटा रिकवर केल्यानंतर दोघांची अश्लिल चॅटींग आणि विनायकशी झालेली बोलणी समोर आली. कट पूर्ण होण्याबद्दल पलकने विनायककडे अनेकदा विचारणाही केली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सीएसपी मनोज रत्नाकर यांनी केली होती. पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू यांच्या भांडणाचा मनस्ताप झाल्याने भैयुजींनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यानंतर या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली. अचानक महाराजांचा आधीचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ महाराजचे वकील राजा उर्फ निवेश बडजात्याकडून पाच कोटी रुपये मागण्याच्या आरोपाखाली पकडला गेला. महाराजांचे कोट्यावधी रुपये विनायककडे आहेत. महाराजांनी पलक,, विनायक आणि शरद यांच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केल्याचा खुलासा भाऊच्या चौकशीत झाला. यानंतर महाराजजींची पत्नी आयुषी आणि मुलगी कुहूने गोपनीय तक्रार दाखल करुन या तपासाची मागणी केली. आझाद नगर सीएसपी अगम जैनने सेवक, ड्रायव्हर, मित्र, ट्रस्टींसहीत साधारण 30 जणांची चौकशी केी आणि त्याचा अहवाल डीआयजीला सोपवला.