Anand Mahindra Viral Tweet: क्रिकट वर्ल्डकपला (ICC WorldCup) अखेर आज पासून 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. यंदा भारताकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही स्पर्धा सुरू आहे. भारतातील क्रिकेटप्रेमींसह जगभरातील चाहते उत्सुक आहेत. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हेदेखील वर्ल्डकपसाठी उत्सुक आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक टिम इंडियाच्या (Team India) जर्सीवर आनंद महिंद्र यांचे नाव आणि एक नंबर आहे. हीच जर्सी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पण चर्चा आहे ती जर्सीवरील नंबरची, या जर्सीवर 55 क्रमांक आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या चेअरमेनने 55 नंबरच का निवडला याचे उत्तर नेटकरी शोधत आहेत. अनेकांनी खुद्द महिंद्रा यांनाच प्रश्न केला आहे मात्र त्यांनी दिलेल्या उत्तराने नेटकरी आणखीन बुचकळ्यात पडले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी 5 ऑक्टोबर रोजी मायक्रोब्लॉगिंग साइट X वर टीम इंडियाची जर्सीचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात जर्सीच्या मागील भागात 55 आणि आनंद असं लिहण्यात आलं आहे. तर, कॅप्शनमध्ये महिंद्राने बीसीसीआयला थँक्यू म्हणत मी वर्ल्डकपसाठी तयार आहे, असं लिहलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला आत्तापर्यंत 49 हजाराहून अधिक व्ह्यू आणि दोन हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर, अनेकांनी तर्क लढवत या 55 नंबरचा अर्थ शोधण्यास सुरुवात केली आहे.
I’m READY….
Thank you @bcci @tech_Mahindra (digital partners of BCCI ) @c_p_gurnani @mohitjoshi74 @manishups08 pic.twitter.com/ip73oTMDlj
— anand mahindra (@anandmahindra) October 5, 2023
एका युजरने आनंद महिंद्रा यांना 55 नंबरचीच जर्सी का? असा सवाल केला. त्यावर आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय देत ट्विट केले आहे. याचं उत्तर कोण शोधतोय हे पाहण्यास मी खूप उत्सुक आहे, असं त्यांनी म्हटलं त्यावर लगेचच लोकांनी त्यावर तर्क वढवायला सुरूवात केली आहे. अनेकांनी त्यांच्यावर रिप्लाय करत त्यांच्यापरीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
I’m curious to see who can figure that out…. https://t.co/mJdQkYuSFJ
— anand mahindra (@anandmahindra) October 5, 2023
एका युजर्सने म्हटलं आहे की तुमचा जन्म 1955 साली झाला म्हणूनच तुमच्या जर्सीवर 55 नंबर आहे. तर एकाने म्हटलं आहे की Kohli आणि Anand मध्ये पाच शब्द आहेत ते दोन्ही शब्द मिळून 55 होतो म्हणून 55 नंबर जर्सीवर देण्यात आला आहे. पण तुम्हाला तरी याचे उत्तर सापडते का, हे आम्हालाही कमेंट करुन सांगा.