मुंबई : बँकेची काही महत्त्वाची कामं असतील तर ती 20 तारखेच्या आतच करुन घ्या. कारण यानंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑल इंडिया ऑफिसर कन्फडरेशनने 21 डिसेंबरला बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्रांच्या नीती विरोधात स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध, वेतनवाढ
22 डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आणि 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल. त्यानंतर सोमवारी 24 डिसेंबरला बँका उघडतील. पण यावेळी तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागेल. 25 डिसेंबरला ख्रिसमन निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरला यूनाइटेड फोरमने पुन्हा स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
5 दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांची अनेक कामं यामुळे अडकून राहतील. चेक क्लिअरन्स होण्यात देखील वेळ लागू शकतो. या दरम्यान पैशांची कमतरता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे नंतर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून बँकांची कामं आताच करुन घ्या. याशिवाय एटीएममधून देखील पैसे काढून ठेवा. बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आणि वेतन वाढ आणि इतर काही मागण्यांसाठी बँकेचे कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत.
नॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ बँक वर्करचे उपाध्यक्ष अश्वनी राणा यांनी म्हटलं की, 'बँक यूनियन 25 टक्के वेतनवाढीची मागणी सरकारकडे करणार आहे. सरकारने अनेक योजना बँकेच्या माध्यमातून लागू केल्या आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारने चांगली वाढ केली आहे पण बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात कमी वाढ केली आहे. देशभरात 10 लाख बँक कर्मचारी आहेत.