पदवीधरांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; 69 हजार पगार; परीक्षेची अट नाही!

Bank Of Baroda: बॅंक ऑफ बडोदामध्ये सिक्युरिटी ऑफिसरच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदवीधरांना अर्ज करता येणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2024, 01:39 PM IST
पदवीधरांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; 69 हजार पगार; परीक्षेची अट नाही! title=
Bank Of Baroda Job

Bank Of Baroda: तुमचं शिक्षण दहावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत झालंय? मग तुम्हाला बॅंक ऑफ बडोदामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. बॅंक ऑफ बडोदामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

बॅंक ऑफ बडोदामध्ये सिक्युरिटी ऑफिसरच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांदरम्यान असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच त्याने किमान 3 महिन्याचा कॉम्प्युटरचा कोर्स केलेला असावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एअर/नेवी/ आर्मीचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. किंवा उमेदवार असिस्टंट कमांडंट पदाशी समकक्ष अनुभव असलेला असावा. एकूण 38 रिक्त जागांमध्ये एससीच्या 5, एसटीच्या 2, ओबीसीच्या 10, ईडब्ल्यूएसच्या 3, यूआरच्या एकूण 18 रिक्त जागांचा समावेश आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार 810 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी 

तयारीला लागा! भारतात 'या' सरकारी नोकऱ्यांना मिळतो लाखोंचा पगार

8 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या. निवड झालेल्या उमेदवाराला 1 वर्षाचा प्रोबेशनकाळ पूर्ण करावा लागेल. 

पदभरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा