आधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?

दान केलेल्या रकमेची आकडेवारी पाहून तुम्हीच म्हणाल श्रीमंती इतकी आणि दान इतकं कमी? 

Updated: Sep 26, 2022, 10:28 AM IST
आधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान? title=
azim premji Biggest philanthropists in India surpasses Gautam Adani

Biggest philanthropists in India:  अदानी उद्योग समुहाचे (Adani Group) चेअरमन,   गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, जेव्हा दान देण्याचा मुद्दा येतो, तेव्हा मात्र ते इतर धनाढ्य व्यक्तींच्याही मागे असल्याची बाब समोर येतो. आकडेवारी फारच रंजक असल्यामुळं हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मागील वर्षी अदानी आणि कुटुंबियांनी 130 कोटी रुपये दान केले होते. तर, त्यांच्याहून कैक पटींनी दान करत अजीम प्रेमजी आणि कुटुंबीयांनी सरशी साधली. त्यांनी तब्बल 9713 कोटी रुपये दान केले. (azim premji Biggest philanthropists in India surpasses Gautam Adani)

Azim Premji: Today Latest News, Photos, Videos about Azim Premji - Zee  Business

'ब्लूमबर्ग बिलिनेयर लिस्ट'च्या माहितीनुसार अदानी सध्याच्या घडीला 142 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह जगभरात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, प्रेमजी 24.6 अब्ज डॉलर्स इतक्या कमाईसह या यादीत 47 व्या स्थानावर आहेत. पण, दानशूरपणाच्या बाबतीत मात्र ते पहिल्या स्थानावर आहेत. तर अदानी आठव्या स्थानावर. 

Mint च्या वृत्तानुसार प्रेमजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मागील वर्षात 9 हजार कोटी रुपयांहून अधिक दान केलं. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही शैक्षणिक उपक्रमांसाठी देण्यात आले. समाजाप्रती असणारी जबाबदारी ओळखत आणि भान जपत त्यांनी केलेलं हे योगदान अतिशय महत्तपूर्ण ठरत आहे. 

सर्वाधिक दान कोणी केलं? 
सर्वाधिक दान करणाऱ्या धनाढ्य व्यक्तींच्या यादीत  एचसीएल (HCL) चे शिव नाडर आणि कुटुंबीय यांनी 1,263 कोटी रुपये दान केले आहेत. यामध्ये बहुतांश रक्कम कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी दान करण्यात आले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर (Mukesh ambani and Family) अंबानी कुटुंबाचं नाव येतं (Reliance Industies), ज्यांनी 577 कोटी रुपये दान केले. या कुटुंबानंसुद्धा सर्वाधिक रक्कम शिक्षण क्षेत्रात दान केली. 

अधिक वाचा :इथे गौतम अदानी अब्जो रुपये कमवत असताना, तिथे त्यांचा भाऊ जगतोय 'असं' आयुष्य

 

यादीतील पुढील नावं अनुक्रमे... (दान केलेली रक्कम मागील वर्षाची आहे.)
एम. बिर्ला आणि कुटुंब- 377 कोटी रुपये 

इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी- 183 कोटी रुपये 

हिंदुजा कुटुंबीय - 166 कोटी रुपये 

बजाज कुटुंब - 136 कोटी रुपये 

वेदांताचे अनिल अग्रवाल आणि कुटुंब- 130 कोटी रुपये 

बर्मन कुटुंब - 114 कोटी रुपये