Rajyabhishek of Lord Rama: रामायण हा हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ आहे. रामायणात भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांचा उल्लेख आढळतो. श्रीराम वनवासात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे बंधू लक्ष्मणही हट्टाने त्यांच्यासोबत वनात जाण्यास निघाले. 14 वर्षांच्या वनवासात लक्ष्मणाने श्रीरामाची व माता सीतेची निस्वार्थी सेवा केली. रामायण या ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो. जेव्हा श्रीराम आणि माता सीता वनातील कुटीत राहत असत तेव्हा लक्ष्मण बाहेर पहारा देत असत. भगवान राम आणि माता सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्णाने तब्बल 14 वर्षांसाठी त्यांच्या झोपेचा त्याग केला होता. यामुळंच जेव्हा श्रीराम वनवासातून अयोध्येत परत आले तेव्हा लक्ष्मणजी आपल्या लाडक्या बंधूचा राज्याभिषेक बघू शकले नाही. यामागेही एक काहणी सांगितली जाते.
हिंदू धर्म ग्रंथानुसार, भगवान श्रीराम विष्णुचे अवतार होते. तसंच, माता सीता देवी लक्ष्मी आणि लक्ष्मण शेषनाग यांचा अवतार आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान राम यांना 14 वर्षांचा वनवास झाला तेव्हा त्यांच्यासोबत माता सीता आणि लक्ष्मणही जायला निघाले. मात्र, वनवासात जाण्यापूर्वी लक्ष्मणाने निद्रा देवीला प्रसन्न करुन वरदान मागितले होते. 14 वर्षांपर्यंत झोप संतुलित ठेवण्याची विनंती निद्रादेवीकडे केली. जेणेकरुन तो भावाची व वहिनीची अखंड सेवा करु शकेल. मात्र, त्याबदल्यात निद्रादेवीने झोप संतुलित ठेवण्यासाठी १४ वर्षे दुस-या कोणाला तरी झोपावे लागेल या अटीवर त्याला वरदान दिले. त्यावेळी त्याच्या वाटणीची झोप त्याची पत्नी उर्मिलाला दिली. अशाप्रकारे भावासाठी लक्ष्मण १४ वर्ष जागा होता तर, तिथे त्याची पत्नी लक्ष्मणासाठी 14 वर्ष राजभवनात झोपून होती.
रामायणातील एका अध्यायानुसार, राम आणि रावणात झालेल्या भीषण युद्धादरम्यान लक्ष्मणाने रावणाचा पुत्र मेघनाद यांचा वध केला होता. मेघनादला एक वर प्राप्त होता. त्यानुसार, 14 वर्षांपर्यंत जागणारा व्यक्तीच मेघनादचा वध करु शकतो.
14 वर्षांच्या वनवास भोगून आल्यानंतर भगवान श्रीरामाचा राज्यभिषेक होणार होता. श्रीराम अयोध्येत येताच लक्ष्मणाने जोरजोरात हसण्यास सुरुवात केली. जेव्हा लोकांनी त्याला हसण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी म्हटलं की, ज्या क्षणाची मी इतके वर्ष वाट पाहत होतो तो आला आलाय. पण मी या क्षणाचा साक्षीदार होऊ शकणार नाही. कारण आजच निद्रादेवीला दिलेले वचन पूर्ण करावे लागणार आहे. निद्रादेवीच्या वरदानानुसार, ते जेव्हा अयोध्येत पोहोचणार तेव्हाच उर्मिलाची झोप तुटणार आणि लक्ष्णाला झोपावे लागणार. यामुळंच त्यांना राज्यभिषेक पाहायला मिळाला नाही. पण श्रीरामाच्या राज्यभिषकेसाठी उर्मिला उपस्थित होत्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)