मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 5, 2023, 06:49 PM IST
मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले title=

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलांना त्यांची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत हे पाशवी कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची मुख्य आरोपी पवन कुमारशी फोनवरुन बोलणं होत होतं. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. 

पोलीस अधिकारी अरविंद कुमार भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात त्याची मुलगी आणि मेहुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची मेहुणी, गावात राहणाऱ्या पवन कुमार नावाच्या तरुणाशी सतत फोनवर बोलायची. पण जेव्हा तिला पवन कुमार विवाहित असल्याची माहिती मिळाली, तेव्हा तिने बोलणं बंद केलं होतं. पण यानंतर पवन तिला वारंवार त्रास देत होता आणि बोलण्याचा प्रयत्न करत होता.  

आरोपीने दोन्ही पीडित मेहुणीला ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीला घाबरुन तरुणी आपल्या भाचीला गेऊन पवनला भेटण्यासाठी गावाबाहेर गेली होती. येथे पवनसह त्याचा मित्र विक्रमही हजर होता. दोघांनीही त्यांचं अपहरण केलं आणि सालासर येथून आधी दिल्ली आणि नंतर बंगळुरुला घेऊन गेले. तिथे त्यांनी एका रुममध्ये दोघींना बंद केलं. यानंतर जवळपास एक महिना दोघंही जबरदस्ती त्यांचं लैंगिक शोषण करत होते. 

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

दोन्ही पीडितांना मद्य पाजल्यानंतर काही कागदपत्रं तयार केली होती. यासाठी त्यांनी त्यांचे फोटोही काढले होते. दुसरीकडे भालेरी पोलीस ठाण्यात दोन्ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस शोध घेत असताना त्यांना सर्विलान्समधून दोन्ही तरुणी बंगळुरुत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी बंगळुरु पोलिसांच्या मदतीने दोन्ही तरुणींची सुटका केली आणि त्यांना कुटुंबाकडे सोपवलं. 

पोलिसांनी दोन्ही तरुणींची सुटका केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसंच आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना लवकरच अटक करु असा पोलिसांचा दावा आहे.