अटलजींचं ते भाकीत खरं ठरलं, काँग्रेसने स्वप्नातही केला नसेल विचार!

अटलजी म्हणाले होते, 'आम्ही त्या क्षणाची वाट पाहू जेव्हा आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल... आज तुम्ही माझी थट्टा कराल पण एक वेळ अशी येईल की लोक तुमची थट्टा करतील.

Updated: Mar 11, 2022, 06:26 PM IST
अटलजींचं ते भाकीत खरं ठरलं, काँग्रेसने स्वप्नातही केला नसेल विचार! title=

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेससह(Congress) सर्व विरोधी पक्षांमध्ये निराशेचं वातावरण आहे. पण यातही सगळ्यात जास्त वाताहत झाली ती काँग्रेसची. कारण काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटलं आहे.  5 राज्यांपैकी 4 मध्ये भाजप (BJP) आणि 1 मध्ये आम आदमी पार्टी (AAP) सरकार स्थापन करणार आहे. 

पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये आधीच भाजपची सत्ता होती. पण ज्या राज्यात 'आप'ने बाजी मारली ते राज्य काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. 

काँग्रेसच्या अस्ताची सुरुवात
काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. भाजपाची विजयी घौडदौड पाहता देशात आगामी काळातही काँग्रेस मोठी उसळी घेऊन वर येईल याची शक्यता फारच कमी असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. पाच राज्यातील पराभवानंतर सोशल मीडियावरही काँग्रेसला ट्रोल केलं जात आहे. लोक त्या काळाची आठवण करुन देत आहेत ज्या काळात काँग्रेसने कमी जागेवरुन भाजपची खिल्ली उडवली होती.

अटलबिहारी वाजपेयींनी केली होती भविष्यवाणी
त्यावेळी माजी पंतप्रधान आणि भाजपचे संस्थापक अटलविहारी वाजपेयी (Atal Vihari Bajpayee) यांनी काँग्रेसला सांगितलं होतं, 'पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल त्या क्षणाची आम्ही वाट पाहू, एक दिवस संपूर्ण देशात कमळ फुलणार असल्याचं त्यावेळी वाजपेयींनी म्हटलं होतं. अटलजी म्हणाले होते, 'आम्ही त्या क्षणाची वाट पाहू जेव्हा आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल... आज तुम्ही माझी थट्टा कराल पण एक वेळ अशी येईल की लोक तुमची थट्टा करतील.

आम्ही कष्ट करत आहोत, संघर्ष करत आहोत, हा 365 दिवस काम करणारा पक्ष आहे. निवडणूक आली की मशरूमसारखा उगवणारा हा पक्ष नाही, आम्ही बहुमताची वाट पाहू, असा निश्चय त्यावेळी वाजपेयी यांनी व्यक्त केला होता. आता भाजपची ती प्रतीक्षा संपली आहे. गेल्या 8 वर्षांपासून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पक्षाला बंपर मतं मिळत आहेत.

वाजपेयींचं भाकीत ठरलं खरं
अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेत काँग्रेसबाबत केलेलं भाकीत आज खरं ठरत आहे. एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला आज यूपीमध्ये 5 जागाही जिंकता आलेल्या नाहीत. 

भाजपाच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर #atalbiharivajpayee ट्रेंड होत आहे.