नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं. अरुण जेटली यांना ९ ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. एम्स रुग्णालयानं एक पत्रक प्रसिद्ध करून अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन झाल्याचं जाहीर केलंय.
- जीएसटी आणि आयबीसी सारख्या मोठ्या सुधारणा
- तूट असलेल्या बँकांचं विलिनीकरण
- एफडीआय नियम सोप्पे केले
- भारतातील परकीय गुंतवणूक वाढविण्यात यश
- महागाई २.२ वरून २.९ टक्क्यांवर आणण्यामध्ये योगदान
- अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेमध्ये बदल
- रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करणे
- काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता कायदा अंमलात आणला
- देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योगदान
- बँकांमधील एनपीए कमी करण्यात यश
- पंतप्रधानांसोबत जन-धन अकाऊंट योजना प्रत्यक्षात आणली
- आधारसह थेट लाभ योजना लाभ
- चलनविषयक धोरण समितीच्या स्थापनेत योगदान