GST स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल, अरुण जेटलींचे संकेत

पाहा काय बोलले अरुण जेटली

Updated: Jul 1, 2018, 05:32 PM IST
GST स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल, अरुण जेटलींचे संकेत title=

नवी दिल्ली : गुड्स अँड सर्विस टॅक्स (GST)ला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने सरकार जीएसटी दिन साजरा करत आहे. यावर बोलतांना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं की, देशातील अप्रत्यक्ष करामधील जटिलता संपली आहे. जीएसटीमुळे टॅक्सच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. आवश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. जनतेली टॅक्समध्ये दिलासा मिळाला आहे. जीएसटीने इशारा दिला आहे की, सरकार आता जीएसटीच्या टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल करु शकते. स्लॅबमध्ये बदल झाल्यानंतर आणखी काही वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात. त्यांनी म्हटलं की, टॅक्सच्या रक्कमेत वाढ झाल्यामुळे सरकार स्लॅबचे दर कमी करु शकते. टॅक्स स्लॅब वाढवले जाऊ शकतात.

सरकारच्या एकूण उत्पन्नात वाढ

किडणी ट्रांसप्लांट झाल्य़ानंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत अरुण जेटली यांनी म्हटलं की, अॅडवांस टॅक्स पेमेंटमुळे एकूण उत्पन्न वाढलं आहे. जीएसटीमुळे भारत एक संगठीत झाला आहे. सरकारचा हा सगळ्यात मोठा आणि मुख्य निर्णय आहे. जेटली यांनी म्हटलं की, 'मागच्या वर्षी देशात सर्वात किचकट अशा टॅक्स सिस्टमला संपवलं. पहिल्या टॅक्स सिस्टममध्ये 17 मल्टिपल टॅक्स आणि 5 प्रकारच्या रिटर्न आणि 23 प्रकारचे सेस लागले होते. टॅक्सवर टॅक्स लागत होता. प्रत्येक राज्य आपल्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे टॅक्स घेत होते'. पण जीएसटीमुळे हे सगळं बंद झालं आहे.